शासनाकडून निधी आणणारा होईल महापौर
By Admin | Updated: December 9, 2014 22:42 IST2014-12-09T22:42:48+5:302014-12-09T22:42:48+5:30
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून डोक्यावर कर्ज आहे.

शासनाकडून निधी आणणारा होईल महापौर
भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून डोक्यावर कर्ज आहे. असे असताना शासनाकडून भिवंडीच्या विकासासाठी जो निधी आणोल तोच मनपाचा महापौर बनेल, असे भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीचे सूत्र बनले आहे. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विद्यमान मंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष घातल्याने शिवसेनेचा महापौर बनविण्याचा प्रयत्न स्थानिक पदाधिकारी व नगरसेवक करीत आहेत. यामुळे येत्या 11 डिसेंबर रोजी होणा:या महापौर व उपमहापौर निवडणूकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
भिवंडी महानगरपालिकेत एकूण 9क् नगरसेवक असून विरोधी पक्षांत काँग्रेसचे 27 आणि शिवसेनेचे 18 असे एकूण 45 नगरसेवक आहेत. तर सत्ताधारी कोणार्क विकास आघाडीच्या 1क् नगरसेवकांसोबत सपाचे 16,भाजपा 1क्, राकाँपा 9 असे एकूण 45नगरसेवक आहेत. या पक्षीय बलाबलांनुसार सत्ताधारी व विरोधक दोघांकडे समसमान नगरसेवक असताना मतदानाच्या दिवशी हजर राहण्यापेक्षा गैरहजर राहणा:या नगरसेवकाचा भाव वधारला आहे. घोडेबाजार सुरू असला तरी भिवंडीची सध्याची स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून निधी आणणा:याकडे महापौरपद जाणार आहे. पालिकेचे प्रशासन स्थानिक कर वसुलीत निष्क्रीय ठरली आहे. पालिकेच्या खजिन्यात पैसा नसल्याने ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत.
तर काही अधिकारी राजीनामा देत तर काही अमर्याद सुट्टीवर गेले आहेत. त्याचा फटका शहराच्या विकासावर होत आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रमासाठी निधी आणणो अत्यावश्यक आहे. त्यामुळे महापौर व उप महापौर पदाच्या उमेदवारांचा त्यात कस लागणार आहे. (वार्ताहर)