माथेरान मिनीट्रेनला दरडींचा ‘ब्रेक’
By Admin | Updated: June 30, 2017 01:17 IST2017-06-30T01:17:42+5:302017-06-30T01:17:42+5:30
मिनीट्रेन सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या हालचाली सुरू असताना, अनेक कारणांनी याला ब्रेक लागत आहे. मुसळधार पावसात माथेरान

माथेरान मिनीट्रेनला दरडींचा ‘ब्रेक’
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : मिनीट्रेन सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या हालचाली सुरू असताना, अनेक कारणांनी याला ब्रेक लागत आहे. मुसळधार पावसात माथेरान मिनीट्रेनच्या मार्गात दरडी कोसळल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोसळलेल्या दरडींच्या ढिगाऱ्याखाली माथेरानचा मार्ग दबला गेला असून, काही ठिकाणी मार्गच दिसेनासा झाला आहे.
मिनीट्रेन पुन्हा सुरू करावी, यासाठी चारी बाजूंनी दबाव वाढत असताना कधी इंजिनामधील त्रुटींमुळे, तर कधी डब्यांमुळे मिनीट्रेन सुरू होऊ शकली नाही. तसेच तांत्रिक दोष दूर करण्याचे प्रयत्न करीत असताना, आता निसर्गानेदेखील अडचणी उभ्या केल्या आहेत. बुधवारी माथेरानमध्ये जोरदार पाऊस झाला. २४ तासांत २२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ९४२ मिलीमीटर पाऊस माथेरानमध्ये पडला आहे.