शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी माथाडींची ४२ वर्षांपासून प्रतीक्षा; १९८२च्या लढ्याच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 08:05 IST

आंदोलकांच्या सेवेसाठी दिवसरात्र मेहनत

-नामदेव मोरेनवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ ला विधानभवनावर भव्य मोर्चा काढला होता. आरक्षण दिले नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नाही आणि अण्णासाहेबांनी आरक्षणासाठीचे पहिले बलिदान दिले. तेव्हापासून ४२ वर्षे माथाडी कामगार आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी लढा देत असून, आताच्या लढ्यात आंदोलकांच्या सेवेसाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहे. 

मराठा आरक्षणासाठीमनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आंदोलकांच्या मुक्कामाची सोय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केली होती. आंदोलकांच्या स्वागतासाठी व त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १० हजारपेक्षा जास्त माथाडी कामगार दोन दिवसांपासून रात्रंदिवस परिश्रम करीत आहेत. आरक्षणाच्या लढ्याशी माथाडी कामगारांचे भावनिक नाते आहे. माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून सर्वप्रथम आरक्षणाची मागणी केली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी २२ मार्च १९८२ला विधिमंडळावर मोर्चा काढला होता. एक लाखापेक्षा जास्त कामगार मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

माथाडी नेत्यांचीही महत्त्वाची भूमिका 

आंदोलकांना राहण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बाजार समिती, महानगरपालिका, पोलिस प्रशासन यांच्याशी बैठक घेऊन आंदोलकांना पाणी, जेवण, शौचालय या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. दोन दिवस मार्केटमध्ये थांबून तयारीवर लक्ष देत होते. अण्णासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माथाडी कामगारांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनीच लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता.

‘तो’ सर्वांत धक्कादायक क्षण 

मोर्चाला संबोधित करताना सरकारने आजच आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर उद्याचा सूर्य मी पाहणार नाही, असा निर्धार व्यक्त केला होता. सरकारने काहीच निर्णय घेतला नाही, यामुळे २३ मार्चला सूर्योदयापूर्वी त्यांनी बलिदान दिले. माथाडी कामगारांना व मराठा चळवळीसाठी तो सर्वांत धक्कादायक क्षण होता. तेव्हापासून मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात माथाडी कामगार सक्रियपणे सहभागी होत आहेत. माथाडी नेते  नरेंद्र पाटील हेही लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या लढ्यातही माथाडी कामगार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. चाळीस वर्षांपूर्वी कोयना खोऱ्यातील पठ्ठ्याने आरक्षणाची चळवळ सुरू केली. आता गोदा पट्ट्यातील मनोज जरांगे यांनी हा लढा निर्णायक टप्प्यावर नेऊन ठेवल्याचा संदेश कामगारांमध्ये फिरत आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNavi Mumbaiनवी मुंबई