यादवनगरमध्ये विवाहितेची गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:48 IST2017-12-26T02:47:58+5:302017-12-26T02:48:01+5:30

नवी मुंबई : विवाहितेची गळा चिरून हत्या झाल्याची घटना यादवनगरमध्ये उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी राहत्या घरात तिचा मृतदेह आढळून आला.

Married husband murdered in Yavainagar | यादवनगरमध्ये विवाहितेची गळा चिरून हत्या

यादवनगरमध्ये विवाहितेची गळा चिरून हत्या

नवी मुंबई : विवाहितेची गळा चिरून हत्या झाल्याची घटना यादवनगरमध्ये उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी राहत्या घरात तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ममता गुप्ता (२४) असे मयत महिलेचे नाव आहे. पती अखिलेशसोबत ती त्या ठिकाणी राहायला होती. सोमवारी सकाळी राहत्या घरात तिचा मृतदेह आढळून आला. घराचा पुढचा दरवाजा बंद असल्याने पाठच्या दरवाजाने पती अखिलेशने आत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत ममताचा मृतदेह पडलेला होता.
सदर घटनेची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी धारदार शस्त्राने गळ्यावर खोलवर वार करून हत्या झाल्याचे समोर आले. त्यानुसार अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कौटुंबिक वादातून तिची हत्या झाल्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी पती अखिलेशवरदेखील संशय व्यक्त केला आहे. यानुसार पतीची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनी सांगितले. ममता आणि अखिलेश यांच्यात
मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते असेही समजते. यावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची शक्यता वर्तवत पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Married husband murdered in Yavainagar