शहरातील बाजारपेठा, मंदिरे सजली
By Admin | Updated: October 13, 2015 02:13 IST2015-10-13T02:13:16+5:302015-10-13T02:13:16+5:30
उदे ग अंबे उदे... म्हणत घटस्थापनेने शहरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. दुर्गोत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठा, मंदिरे सजली असून मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आहे

शहरातील बाजारपेठा, मंदिरे सजली
नवी मुंबई : उदे ग अंबे उदे... म्हणत घटस्थापनेने शहरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. दुर्गोत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठा, मंदिरे सजली असून मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी धार्मिक, सामाजिक तसचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांची अलोट गर्दीचे शिस्तबध्द नियोजनासाठी सर्वच नवरात्रोत्सव मंडळाने कार्यकर्त्यांनी विशेष आखणी केली आहे.
सीबीडी बेलापूर येथील सप्तशृंगी माता मंदिर मंदिराच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कालिमाता मंदिर, दुर्गामाता मंदिर परिसरांमध्येही होम हवन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुग्धाभिषेक, काकड आरती, भजन, कीर्तन, गोंधळ, नवचंडी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रीनिमित्त देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापनेसाठी लागणाऱ्या परडी, वस्त्र, घट, ओटी, नऊ वाती, सात धान्ये, फळे आणि वावरी (माती), अशा विविध वस्तूंनी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. कापूर, अत्तर, मध, अगरबत्ती आणि हळदी-कुंकू अशा वस्तूंनाही मागणी आहे. मंडईत अनेक विक्रेते लहान-मोठी दुकाने उभारून विविध वस्तूंची विक्र ी करीत आहेत.