पूजेच्या साहित्याने बाजारपेठ खच्चून भरली

By Admin | Updated: September 14, 2015 03:46 IST2015-09-14T03:46:27+5:302015-09-14T03:46:27+5:30

गणपती बाप्पाला लागणाऱ्या पूजेच्या सामानानेही बाजारपेठ खच्चून भरली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत या सामानाच्या दरांमध्ये १५ ते २० टक्कयांनी वाढ झाली आहे.

The market was full of puja literature | पूजेच्या साहित्याने बाजारपेठ खच्चून भरली

पूजेच्या साहित्याने बाजारपेठ खच्चून भरली

भाग्यश्री प्रधान, ठाणे
गणपती बाप्पाला लागणाऱ्या पूजेच्या सामानानेही बाजारपेठ खच्चून भरली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत या सामानाच्या दरांमध्ये १५ ते २० टक्कयांनी वाढ झाली आहे. वाहतूक खर्च तसेच कारागिरांची मजुरी आणि कच्चा माल महाग झाल्याने ही वाढ झाली आहे. या पूजेच्या सामानामध्ये हळदकुंकू, अगरबत्ती, जानवेजोड, कापूर, धूप, सुपारी, विड्याची पाने आदी गोष्टींचा समावेश आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी अगरबत्ती, धूप व कापूर या
गोष्टींना दरवर्षीच मोठ्या प्रमाणात मागणी असते.
मागच्यावर्षी ९० रुपयांना मिळणारी अगरबत्ती यावर्षी १२० रुपयांना मिळत असून १०० ग्रॅम केवडा, पानडी, मोगरा अगरबत्ती ३० रुपयांना मिळत आहे.तसेच विक्रेते प्रसाद प्रधान यांनी गणपतीसाठी दोन वर्षांपासून खास लांब अगरबत्ती विक्रीसाठी येत असल्याचे सांगितले. ही अगरबत्ती चार ते पाच तास जळते आणि तिच्या सुगंधामुळे वातावरणही भक्तिमय होते.तसेच १०० ग्रॅम मसाला अगरबत्ती ९० ते १०० रुपयांना मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. धूपांमध्येही चामुंडाय, विनायक, रॅडो धूप कॅण्डीची बाजारात चलती आहे. तर, १०० ग्रॅम साधा धूप साधारण ५० रुपयांपर्यंत मिळत आहे. अत्तराच्या छोट्या कुपीलाही गिऱ्हाइकांची मागणी जास्त प्रमाणात असते, असे विक्रेत्यांनी सांगितले.
या अत्तरांमध्ये मोगरा, केवडा, जस्मीन,रोज, सोनचाफा आदी प्रकार असून या अत्तराची किंमत १० पासून १५० रुपयांपर्यंत आहे. खारीक, बदाम, आक्रोड, हळकुंड, सुपारी आदी पदार्थ एकत्र करून बनविलेले पाकीट ५० रुपयांना बाजारात मिळत आहे. काही जण गणेशोत्सवादरम्यान सत्यनारायण पूजा घालत असल्याने सत्यनारायणाला लागणारे सर्व पूजा साहित्य एकत्र करून सेट तयार केला जातो. हा सेट ५०० ते १५०० पर्यंत विकत असल्याचे विक्रेते प्रतीक विव्दांस यांनी सांगितले. काही दुकानदार हळदकुंकू कोल्हापूरवरून मागवितात. या कुंकु वामध्ये हळदीचा इसेन्स टाकला जातो, त्यामुळे हे कुंकू कपाळाला लावल्यानंतर कोणतीही अ‍ॅलर्जी होत नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: The market was full of puja literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.