शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सरकारसोबत मराठा आंदोलकांचा रंगला बुद्धिबळाचा डाव, अशा खेळल्या गेल्या चाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 07:44 IST

Maratha Reservation: मराठा आंदोलनातील निर्णायक लढ्यातील शेवटच्या टप्प्यात नवी मुंबईमध्ये आंदोलक व सरकार यांच्यामध्ये बुद्धिबळाचे डावपेच सुरू होते. २६ जानेवारीची अख्खी रात्र नवी मुंबई जागी हाेती.

नवी मुंबई : मराठा आंदोलनातील निर्णायक लढ्यातील शेवटच्या टप्प्यात नवी मुंबईमध्ये आंदोलक व सरकार यांच्यामध्ये बुद्धिबळाचे डावपेच सुरू होते. २६ जानेवारीची अख्खी रात्र नवी मुंबई जागी हाेती. मनोज जरांगे-पाटील शहरात दाखल होण्याच्या चर्चेपासून ते शनिवारी पहाटेच्या पत्रकार परिषदेपर्यंत २४ तास प्रत्येक क्षण कसोटीचा ठरला होता. नवी मुंबईत आल्यापासून ते परत जाईपर्यंत बुद्धिबळाचा लढा सुरू झाला.

अंक पहिला पहाटे ३ : बाजार समितीमध्ये आंदोलकांबरोबरच गर्दी.पहाटे ५ : लोणावळ्याहून जरांगे बाजार समितीत दाखल सकाळी ८.३० : ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती.९.१५ :  सुमंत भांगे यांच्यासह सरकारचे शिष्टमंडळ, कागदपत्रे घेऊन बाजार समितीत दाखल.१०.३६ : शिष्टमंडळासोबतची बैठक आटोपली.११.३० : सहकारी आणि तज्ज्ञांच्या चर्चेनंतर जरांगे यांनी इमारतीबाहेर येऊन आंदोलकांशी संवाद. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेण्याचे जाहीर केले. दुपारी १२.३० : वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेला सुरुवात.१२.५५ : साउंड सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे सभा २ वाजता घेण्याची घोषणा.३.३० : पुन्हा सभेला सुरुवात.सायंकाळी ४ : सगेसोयऱ्यांचा अध्यादेश, गुन्हे मागे घेणे, नोकर भरती महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या मागण्या. नवी मुंबईतच मुक्काम करण्याचा निर्धार.

अंक २सायंकाळी ४ ते ११ : सभेनंतर सात तासांत विविध तज्ज्ञांची चर्चा, शासनाने दिलेल्या पत्रांचा सखोल अभ्यास व पुढील दिशा ठरविण्यासाठीचे नियोजन.रात्री ११ : सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डाॅ. अमोल शिंदे हे  सुधारित अधिसूचना घेऊन बाजार समितीमध्ये दाखल.मध्यरात्री १२ : शिष्टमंडळासोबत तज्ज्ञांकडून अधिसूचना अभ्यासण्यास सुरुवात. १.३० : मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा चर्चा करण्यासाठी बाजार समितीमध्ये दाखल.२.३० : मध्यरात्री जरांगे यांनी इमारती बाहेर येऊन आंदोलकांशी चर्चा केली व शासनाकडून मागण्या मान्य झाल्याचे सर्वांना सांगितले. २.५२ : जरांगे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू. ३.०० : पहाटे सगेसोयऱ्यांना कुणबी दाखला देण्याची अधिसूचना दाखवत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिसूचना स्वीकारण्याचे जाहीर.३.१५ : सरकारचे शिष्टमंडळ बाजार समितीमधून बाहेर.३.३० : बाजार समितीमध्ये फटाके फोडून, ढोल-ताशा वाजवून आनंदोत्सवाला सुरुवात.अंक ३सकाळी ९.३० :  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोसंबीचा रस घेत जरांगे-पाटील यांनी उपोषण साेडले. सकाळी ९.५७ : ऐतिहासिक विजयी सभेला सुरुवात.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार