शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

टाकाऊ संगणकीय साहित्यापासून साकारला नवी मुंबईचा नकाशा;  थ्री आर अंतर्गत निर्मिती

By नारायण जाधव | Updated: June 16, 2023 17:07 IST

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचे विहंगम दर्शन घडविणारा नकाशा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात प्रदर्शित करण्यात आला असून या नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती टाकाऊ संगणकीय साहित्यापासून केली आहे.

नवी मुंबई : पूर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पश्चिमेकडील खाडीकिनारा यामध्ये वसलेले नवी मुंबई शहर सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजले जाते. 109.59 चौ.कि.मी. क्षेत्रात विस्तारलेली नवी मुंबई दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, नेरुळ, बेलापूर अशा 8 विभागांत सामावलेली आहे. अशा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचे विहंगम दर्शन घडविणारा नकाशा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात प्रदर्शित करण्यात आला असून या नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती टाकाऊ संगणकीय साहित्यापासून केली आहे.

यापूर्वी महापालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागात लावण्यात आलेल्या संगणकीय टाकाऊ साहित्यापासून तयार केलेल्या मदर इंडिया बोर्ड स्वरुपातील भारताच्या नकाशा ची विक्रमी नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय पातळीवर झालेली असून अशाच प्रकारचा नकाशा कोपरखैरणे येथील स्वच्छता पार्कमध्ये लावण्यात आलेला आहे. हे नकाशे संगणकातील अथवा लॅपटॉपमधील विविध टाकाऊ साहित्यापासून बनविण्यात आलेले आहेत.

याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा 5 फूट उंचीचा नादुरूस्त संगणक व लॅपटॉपधील मदरबोर्ड व इतर साहित्यापासून तयार केलेला नकाशा महापालिका मुख्यालयातील आयुक्त  दालनात प्रदर्शित करण्यात आला आहे.  23 निरुपयोगी लॅपटॉप, संगणकातील सर्कीट बोर्ड, कन्डेन्सर बॅटरी व वायर्स यांचा वापर करून बनविलेला हा नवी मुंबईचा नकाशा त्याच्या आगळ्या वेगळ्या स्वरुपामुळे पटकन लक्ष वेधून घेतो.      नवी मुंबईतील वेस्ट टू बेस्ट आर्टिस्ट  किशोर बिश्वास यांनी आपल्या सहका-यांसह मदर इंडिया बोर्ड नकाशासारखाच हा नवी मुंबईचा नकाशाही टाकाऊ वस्तूंपासून बनविलेला असून त्यामुळे आयुक्त दालनाची शोभा वाढली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत थ्री आर संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम लोकसहभागातून राबविले जात असून कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) व कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) अशा प्रकारे थ्री आर ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये रियुज अर्थात कच-याचा पुनर्वापर करणे या संकल्पनेनुसार संगणकीय निरुपयोगी साहित्यापासून नवी मुंबईचा नकाशा बनविण्यात आलेला असून आयुक्तांच्या भेटीसाठी येणा-या मान्यवर व नागरिकांमध्ये याव्दारे थ्री आर च्या संदेशाचे प्रसारण होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई