शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल परिसरातील अनेक गृहनिर्माण प्रकल्प बंद, घर खरेदी-विक्रीवर  कोरोनाचा मोठा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 09:49 IST

भासत असल्याने, घर खरेदी-विक्रीकडे नागरिकांनी पाठ दाखविली आहे, तर पनवेल परिसरातील अनेक गृहनिर्माण प्रकल्प बंद पडले आहेत. नवी मुंबई विमानतळाची सिडकोच्या माध्यमातून पनवेलजवळच निर्मिती होत असल्याने, आजूबाजूच्या परिसराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

कळंबोली : कोरोना रोगोच्या महामारीमुळे पनवेल परिसरातील रिअल इस्टेट व्यवसायात मंदी आली आहे. लॉकडाऊनचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. दरवर्षी दसरा-दिवाळीच्या मुहुर्तावर घर घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असते, परंतु आर्थिक चणचण

भासत असल्याने, घर खरेदी-विक्रीकडे नागरिकांनी पाठ दाखविली आहे, तर पनवेल परिसरातील अनेक गृहनिर्माण प्रकल्प बंद पडले आहेत. नवी मुंबई विमानतळाची सिडकोच्या माध्यमातून पनवेलजवळच निर्मिती होत असल्याने, आजूबाजूच्या परिसराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक गृनिर्माण प्रकल्प पनवेल शहरासह तालुक्यात सुरू झाले. जागेचे भावही गगनाला भिडले होते.

घर खरेदी-विक्रीत तेजी आली असल्याने, व्यावसायिक जागा खरेदी करून, त्यावर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर सिडकोने नैना प्राधिकरणाची स्वतंत्र स्थापन करण्यात आलेल्या परिसरात  बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मात्र, कोरोनाच्या  संकटाने रिअल इस्टेट व्यवसायात मंदी आली आहे.त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर कोणतीही बुकिंग नसल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. या आगोदर नागरिकांनी घरखरेदी केलेल्यांनाही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

कोरोनामुळे कामगार मिळत नसल्यानेही इमारतीचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे बुकिंग ग्राहकासह बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले आहे. या आगोदर नैना प्रकल्पामुळे व्यावसायिकांना विकास शुल्क जास्त प्रमाणात भरावे लागत असल्याने, व्यावसायिकांनी नाराजी व्याक्त केली होती. सद्य परिस्थितीत कोरोनामुळे पनवेल, पोयंजे, वाकडी, शिवकर, विचुंबे, नेरे, वाकडी या परिसरातील बांधकाम बंद आहेत. 

मार्केटमध्ये घरांचे खरेदी-विक्री व्यवहार कमीच झाले आहेत. कोरोनामुळे ग्राहकांनी पाठ दाखवली आहे. या आगोदर सिडको नैनाच्या जाचक अटीमुळे बांधकाम व्यावसायिक हतबल झाले आहेत. आता कोरोनामुळे कंबरडेच मोडले.     - रूपेश भोईर,     न्यू मिलिनियम डेव्हलपर्स पनवेल  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReal Estateबांधकाम उद्योगNavi Mumbaiनवी मुंबई