शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कळंबोलीत अल्प उत्पन्न गटातील अनेक घरे भोगवटा प्रमाणपत्राविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:43 IST

सिडकोकडून कारवाई नाही : दंडात्मक कारवाईची गृहसंस्थांची मागणी

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कळंबोली वसाहतीत अल्प उत्पादन गटातील अनेक धारकांनी सिडकोकडून भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही. ते बेकायदेशीररीत्या सदनिकांचा वापर करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. प्राधिकरणाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळे सिडकोचे नियम पाळणाऱ्या तसेच भोगवटा प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. अशांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी येथील गृहनिर्माण संस्थांकडून होत आहे.

सिडकोने कळंबोली वसाहत विकसित करताना अल्पउत्पादन गटातील लोकांकरिता गृहनिर्माण योजना आखली. त्यांना अत्यल्प दरात जागा उपलब्ध करून दिली. दरम्यान, या योजनेतील २४, २८ आणि ३२ मीटर क्षेत्रफळावर घरे बांधण्यात आली आहेत. कळंबोली वसाहतीत अशाप्रकारे एकूण १३०० घरे आहेत. प्रत्येक सोसायटीमध्ये २४ युनिट आहेत. कळंबोली सेक्टर १४ आणि १५ मध्ये सोडत पद्धतीने सिडकोकडून भूखंड वाटप करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी सोसायट्या निर्माण झाल्या. बिल्डरांशी करार करून बांधकाम करून घेतले. सिडकोकडून मिळालेल्या भूखंडावर दिलेल्या वेळेत बांधकाम करणे बंधनकारक आहे; परंतु कित्येकांनी हे भूखंड दुसºयांना विकले, तर त्यांनी आणखी तिसºयाला त्याची विक्री केली. त्यामुळे या ठिकाणी बांधकाम करण्यास विलंब लागला. उशिरा झालेल्या बांधकामामुळे सिडकोकडून विलंब शुल्क आकारण्यात येते. ही रक्कम चार ते पाच लाखांवर जात असल्याने अनेकांनी ती सिडकोला भरली नाही. याशिवाय ना हरकत दाखले, कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केल्यास सिडकोकडून त्यांना स्वतंत्र भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते; परंतु अनेकांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही. असे असतानाही ते त्या ठिकाणी राहून अनधिकृतपणे जागेचा वापर करीत आहेत. सोसायटीतील इतरांचे भोगवटा प्रमाणपत्र असल्याने सिडकोकडून पाणीपुरवठा केला जातो. त्याचबरोबर सार्वजनिक मलनि:सारण वाहिनी असल्याने भोगवटा प्रमाणपत्र नसलेलेही त्याचा वापर करीत आहेत. विशेष म्हणजे, काहींनी तीन मजले बांधून त्या ठिकाणी भाडोत्री ठेवले आहेत. याचा परिणाम पाणीपुरवठा, सांडपाण्याची विल्हेवाट लावणाºया यंत्रणेवर होत आहे.

नियमानुसार जोपर्यंत भोगवटा (ओसी) प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत त्या घरांचा वापर करता येत नाही; परंतु अनेकांनी नियम धाब्यावर बसवले आहेत. सोसायटीतील इतर सभासदांनी सिडकोच्या नियमांची पूर्तता करून ओसी मिळवली आहे. त्याकरिता आवश्यक असणारे शुल्कही भरले आहे. मात्र, भोगवटा प्रमाणपत्र न घेणारे अनधिकृतपणे पायाभूत सुविधांचा वापर करीत आहेत. यामुळे प्रामाणिक सदनिकाधारक आपल्यावर अन्याय झाला असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. सिडकोने याबाबत कधीही पडताळणी केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र घेणाºयांकडून सिडको विरोधात संताप व्यक्त होत आहे.

युनिटधारकांना वारंवार सूचना करीत आहोत. तरीही त्यांच्याकडून उदासीनता दिसून येत आहे. त्यांनी कागदपत्राची पूर्तता करून, ओसी घेणे बंधनकारक आहे. मात्र, तसे न केल्यास युनिटधारकांना वसाहत विभागाकडून एलपीसी दंड आकारला जातो. लवकरच यावर कार्यवाही करण्यात येईल. - आर. बी. टकले, सहायक वसाहत अधिकारी, सिडको