मानदेश एक्सप्रेस ललिता बाबर पनवेलच्या प्रशिक्षणार्थी प्रांतअधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 17:55 IST2021-02-03T17:55:08+5:302021-02-03T17:55:16+5:30
पनवेल :साताऱ्यातील मानदेश एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणारी, रिओ ऑलंपिकमध्ये स्पर्धेत आपला ठसा उमटविणाऱ्या ललिता बाबर प्रांताधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत ...

मानदेश एक्सप्रेस ललिता बाबर पनवेलच्या प्रशिक्षणार्थी प्रांतअधिकारी
पनवेल :साताऱ्यातील मानदेश एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणारी, रिओ ऑलंपिकमध्ये स्पर्धेत आपला ठसा उमटविणाऱ्या ललिता बाबर प्रांताधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहेत.रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात तहसिलदार पदाचे प्रशिक्षण घेण्याची सुरूवात केली.
पनवेलचे प्रांतअधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम सुरू केले आहे. दोन तालुके असलेल्या उपविभागीय कार्यालयात प्रशिक्षणार्थी प्रांतअधिकाऱ्यांची नियुक्ती करून सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे बाबर यांना उरण तालुक्याच्या प्रांतअधिकारी म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
बाबर यांच्या प्रवास सर्वसामान्य शेतकरी कुटुंबियातील प्रत्येक विद्यार्थ्यांना आदर्शवत आहे.आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करीत असताना कधीही कोणती अपेक्षा केली नाही.मेहनतीने या पदापर्यंत मजल मारता आली असल्याची प्रतिक्रिया बाबर यांनी यावेळी दिली.