‘महायुती-आघाडीचा तमाशा बंद करा’

By Admin | Updated: October 1, 2014 02:49 IST2014-10-01T02:49:53+5:302014-10-01T02:49:53+5:30

आघाडीचा केंद्रात एक अन् राज्यात एक असा प्रकार सुरू आहे. काही ठिकाणी विरोधकांशीही हातमिळवणी होत आहे. त्यामुळे मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या.

'Mahayuti-Front of the show' | ‘महायुती-आघाडीचा तमाशा बंद करा’

‘महायुती-आघाडीचा तमाशा बंद करा’

>डोंबिवली : ‘आघाडीचा केंद्रात एक अन् राज्यात एक असा प्रकार सुरू आहे. काही ठिकाणी विरोधकांशीही हातमिळवणी होत आहे. त्यामुळे मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या. महायुतीसह आघाडीच्या तमाशाचे फड बंद करा,’ असे आवाहन मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांनी केले आहे.
‘महायुतीसह आघाडीने गेली अनेक वर्षे सोत राहून नागरिकांची थट्टाच केली आहे. त्यातच त्यांच्या अंतर्गत ‘सेटिंग’च्या राजकारणामुळेही मतदार पिचला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ‘ठाणो जिल्ह्यातील शिंदेशाहीचा अस्त करण्याची संधी दवडू नका,’ असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. महाफुटीनंतर 48 तासांत कल्याण-डोंबिवलीत त्या पक्षाची वाताहात झाली. त्यावरुनच दडपशाही कशी असते हे लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  (प्रतिनिधी)

Web Title: 'Mahayuti-Front of the show'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.