वाशीत महावीर जन्म कल्याणाक महोत्सव संपन्न; शेकडो नागरिकांची उपस्थिती

By योगेश पिंगळे | Updated: April 4, 2023 17:29 IST2023-04-04T17:29:42+5:302023-04-04T17:29:53+5:30

वाशी सेक्टर ९ येथील जैन मंदिरापासून सकाळी आठ वाजता उत्साहात शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली होती.

Mahavir Janm Kalyanak Festival concluded in Vashi; Attendance of hundreds of citizens | वाशीत महावीर जन्म कल्याणाक महोत्सव संपन्न; शेकडो नागरिकांची उपस्थिती

वाशीत महावीर जन्म कल्याणाक महोत्सव संपन्न; शेकडो नागरिकांची उपस्थिती

नवी मुंबई - सकल जैन संघाच्यावतीने वाशी सेक्टर ९ येथील जैन मंदिरात मंगळवारी भगवान महावीर जन्म कल्याणाक महोत्सवाचे आयोज़न करण्यात आले होते. यावेळी भव्य शोभा यात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोज़न करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शेकडो नागरिक उपस्थित होते.

भगवान महावीर जन्म कल्याणाक महोत्सवाच्या निमित्ताने सकल जैन संघाच्या वतीने विविध चार संप्रदायाच्या माध्यमातून 'एक शाम महावीर भगवान के नाम' या शीर्षकाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाशी सेक्टर ९ येथील जैन मंदिरापासून सकाळी आठ वाजता उत्साहात शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. या यात्रेत शेकडो भाविक उपस्थित होते. यात्रेनंतर मंदिरात अभिषेक, शांतीधारा, मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचा सत्कार, सामूहिक भोजन आदी कार्यक्रमांसह संध्याकाळी आरती आणि संगीतकार निलेश राणावत यांच्या भजन संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील शेकडो भाविक भक्त उपस्थित होते.

Web Title: Mahavir Janm Kalyanak Festival concluded in Vashi; Attendance of hundreds of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.