शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र ‘लॉजिस्टिक हब’ होणार; राज्य सरकारने आखली योजना

By नारायण जाधव | Updated: January 26, 2025 11:03 IST

नवी मुंबईतील जेएनपीए नजीकच्या आंतरराष्ट्रीय हबला मोठी मागणी राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासह महाराष्ट्राला देशाचे लॉजिस्टिक हब करण्याची योजना राज्य  सरकारने आखली आहे. यात नवी मुंबईसह पुण्यात आंतरराष्ट्रीय तर वर्धा व नागपूरमध्ये राष्ट्रीय आणि पाच प्रादेशिक लाॅजिस्टिक हब आणि २५ जिल्ह्यांत जिल्हा लॉजिस्टिक हब विकसित करण्यात येणार आहेत. यापैकी नवी मुंबईतील जेएनपीए नजीकच्या आंतरराष्ट्रीय हबला मोठी मागणी राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यात लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले असतानाच राज्यात येणाऱ्या या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना लागणारा कच्चा माल व उत्पादित होणार पक्का माल ठेवण्यासाठी लॉजिस्टिक हब महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत.

जीडीपी वाटा २० टक्क्यांवर नेणार देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचे योगदान १४ टक्के आहे. २०२८ पर्यंत एक ट्रिलियन डॉलर जीडीपी गाठण्याचे उद्दिष्ट राज्याचे आहे. तर देशाने निर्धारित केलेल्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान २० टक्के राहील, असा अंदाज राज्य सरकारने लॉजिस्टिक धोरणात व्यक्त केला आहे.

‘भिवंडी’बाबत लवकरच निर्णय‘लॉजिस्टिक हब’अंतर्गत अस्ताव्यस्तपणे बांधलेल्या भिवंडीतील अनेक अनधिकृत गोदामांबाबतही योग्य तो निर्णय घेऊन या भागात सुसज्ज रस्ते, रेल्वे कनेक्टिव्हिटीसह त्यांना बंदरांना जोडण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात गोदामांची सर्वात मोठी साखळी भिंवडीतच आहे.

१० हजार एकरावर उभी राहणार गोदामांची साखळी‘महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण २०२४’अंतर्गत राज्यात १० हजार एकरहून अधिक क्षेत्रावर समर्पित दळणवळणासाठीच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी २५ जिल्ह्यांत प्रत्येकी १०० एकरांवर जिल्हा लॉजिस्टिक हब बांधण्यात येणार आहे. भिवंडी, पुरंदर (पुणे), वाढवण (पालघर), रत्नागिरी-सिंधुदुर्गात आणि जालना येथे प्रत्येकी ३०० एकर, असे पाच  प्रादेशिक लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहेत. शिवाय वर्धा आणि नागपूर येथील राष्ट्रीय लॉजिस्टिक मेगा हब प्रत्येकी १५०० एकर तर नवी मुंबईसह पुण्यातील आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक मेगा हब प्रत्येकी २००० एकरांचे राहणार आहे. यात सुविधा प्रकल्प राबविण्यासाठी ७ हजार कोटी तसेच लघु, मोठे, विशाल, अतिविशाल, एकात्मिक ट्रक टर्मिनल्ससाठी भांडवली अनुदानासाठी ६३५ कोटी तसेच तंत्रज्ञान सहाय्यासाठी द्यावयाच्या प्रोत्साहनांकरिता  ६७५  कोटी असे ८३१० कोटींची तरतूद आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNavi Mumbaiनवी मुंबई