महाडमध्ये महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना अभिवादन
By Admin | Updated: December 7, 2015 01:19 IST2015-12-07T01:19:14+5:302015-12-07T01:19:14+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाडमध्ये अभिवादन करण्यात आले. ऐतिहासिक चवदार तळे तसेच क्रांतिभूमीवर अभिवादन करण्यासाठी अनेक मान्यवरांसह नागरिकांनी हजेरी लावली

महाडमध्ये महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना अभिवादन
महाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाडमध्ये अभिवादन करण्यात आले. ऐतिहासिक चवदार तळे तसेच क्रांतिभूमीवर अभिवादन करण्यासाठी अनेक मान्यवरांसह नागरिकांनी हजेरी लावली. आ. भरत गोगावले, पंंचायत समिती सभापती दीप्ती फळसकर, महाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, डीवासएसपी प्रांजली सोनावणे, तहसीलदार संदीप कदम आदींनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी बौद्धजन पंचायत समिती, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, दलितमित्र बाबाजी साळवे, तुळशीदास जाधव, रिपाइं तालुकाध्यक्ष मोहन खांबे, प्रभाकर खांबे, बिपीन साळवे उपस्थित होते. विविध ठिकाणाहून आणण्यात आलेल्या भीमज्योती चवदार तळे येथे दाखल झाल्या होत्या. (वार्ताहर)