महिला पत्रकारांचे आज राष्ट्रीय संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:53 IST2017-07-29T01:53:49+5:302017-07-29T01:53:49+5:30

नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्र (संलग्न नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट इंडिया, नवी दिल्ली) यांच्या वतीने २९ व ३० जुलै रोजी पनवेलमधील आद्य क्र ांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह

mahailaa-patarakaaraancae-aja-raasataraiya-sanmaelana | महिला पत्रकारांचे आज राष्ट्रीय संमेलन

महिला पत्रकारांचे आज राष्ट्रीय संमेलन

पनवेल : नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्र (संलग्न नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट इंडिया, नवी दिल्ली) यांच्या वतीने २९ व ३० जुलै रोजी पनवेलमधील आद्य क्र ांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महिला पत्रकारांचे राष्ट्रीय संमेलन होत आहे. या प्रसंगी पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवणाºया पाच महिला पत्रकारांना ‘सौदामिनी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करणार आहेत.
विविध क्षेत्रात कार्य करणाºया महिलांना ‘सौदामिनी लक्षणीय योगदान’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या ऐतिहासिक संमेलनासाठी राज्यभरातून व इतर राज्यातून सातशेहून अधिक महिला पत्रकार सहभागी होणार आहेत. संमेलनाचे सुकाणू समिती उपाध्यक्ष गणेश कोळी यांनी या संमेलनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. एन.यू.जे. महाराष्ट्रचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शिवेंद्र कुमार यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली होणारे हे संमेलन महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास मार्गदर्शक डॉ. उदय जोशी आणि स्वागताध्यक्ष शीतल करदेकर यांनी व्यक्त केला.
प्रथमच महिलांचे राष्ट्रीय संमेलन होत असून त्याचा बहुमान महाराष्ट्राला आणि रायगड जिल्ह्याला मिळणार आहे. नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट इंडियाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे हा कार्यक्र म आयोजित केला आहे. नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट इंडियाचे संस्थापक राजेंद्र प्रभू, रासबिहारी प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया सदस्य प्रग्यानंद चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ३० तारखेलाही विविध कार्यक्रम होणार आहेत.

Web Title: mahailaa-patarakaaraancae-aja-raasataraiya-sanmaelana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.