झेंडूची आवक वाढली
By Admin | Updated: October 11, 2016 03:47 IST2016-10-11T03:47:39+5:302016-10-11T03:47:39+5:30
दसरा-दिवाळीतील पूजेत झेंडूच्या फुलांना अनन्य साधारण महत्त्व असते. यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडल्याने फूलशेतीही चांगली

झेंडूची आवक वाढली
कळंबोली : दसरा-दिवाळीतील पूजेत झेंडूच्या फुलांना अनन्य साधारण महत्त्व असते. यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडल्याने फूलशेतीही चांगली झाली. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झेंडूू दाखल झाला असून प्रतिकिलो ६० ते ८० रुपये किंमत आहे.
गतवर्षी एक किलो झेंडूसाठी ग्राहकांना १४० रुपये मोजावे लागले होते. सध्या बाजारात दाखल झालेला झेंडू टवटवीत, आकाराने मोठा आहे. पाऊस चांगला पडल्याने झेंडू बहरण्यास मदत झाली; मात्र परतीच्या पावसाने फूलशेतीचे नुकसान झाले.
विजयादशमीनिमित्त कल्याण व दादर या ठिकाणच्या फूलबाजारामध्ये यंदा फुलांची आवक वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना ६० ते ८० रुपये प्रति किलोने झेंडू विक्री होत आहे. कळंबोली, कामोठे, पनवेलमध्ये दरवर्षी पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा जिल्ह्यातून शेतकरी थेट विक्रीसाठी फुले घेऊन येतात. यंदा चांगल्या पावसामुळे फुलांचे उत्पादन वाढल्याने भाव कमी मिळत असल्याचे अंकुश हिंदुराव येळे या शेतकऱ्याने सांगितले. दादर त्याचबरोबर इतर फूलबाजारात पंधरा टक्के आडत द्यावी लागते म्हणून आम्ही गेल्या पाच वर्षांपासून पनवेल परिसरात रस्त्यावर फुलांची विक्री करतो. त्यामध्ये आम्हाला नफा होतो व ग्राहकांनाही स्वस्तात फुले मिळतात, असे येळे म्हणाले. (वार्ताहर)