तळा पंचायतीत तीस पदे रिक्त

By Admin | Updated: July 14, 2015 23:16 IST2015-07-14T23:16:45+5:302015-07-14T23:16:45+5:30

येथील पंचायत समिती कार्यालयात विविध खात्यात तीस पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास विलंब होतो. ही पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

Lower thirty Panchayat vacancies vacant | तळा पंचायतीत तीस पदे रिक्त

तळा पंचायतीत तीस पदे रिक्त

तळा : येथील पंचायत समिती कार्यालयात विविध खात्यात तीस पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास विलंब होतो. ही पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.
तळा पंचायत समितीमध्ये सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ सहाय्यक तीन पदे, विस्तार अधिकारी सांख्यिकी एक पद, आरोग्य पर्यवेक्षक एक पद, शिपाई दोन पदे, सहाय्यक लेखाधिकारी एक पद, पशुधन पर्यवेक्षक एक पद, कनिष्ठ अभियंता एक पद अशी एकूण या विभागात १० पदे रिक्त आहेत, तर ग्रामपंचायत विभागात तीन ग्रामसेवक पदे रिक्त आहेत. पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी दोन पदे, पशुधन पर्यवेक्षक एक पद, अशी तीन पदे रिक्त आहेत. स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना विभागात विस्तार अधिकारी (उद्योग) एक पद रिक्त आहे. शिक्षण विभागात गेली अनेक वर्षे गटशिक्षण अधिकारी हे पद रिक्त आहे. याबाबत अनेक वेळा वर्तमानपत्रातून ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे. हे गटशिक्षणाधिकारी पद त्वरित भरावे अशी नागरिकांची मागणी आहे.
आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी एक पद, कनिष्ठ सहाय्यक एक पद, वाहनचालक एक पद, आरोग्य सेवक एक पद, शिपाई एक पद, सफाई कामगार एक पद, आरोग्य सेविका एक पद, अर्धवेळ परिचर एक पद अशी नऊ पदे रिक्त आहेत. (वार्ताहर)

कामांना विलंब
-महिला व बालकल्याण एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प विभागात पर्यवेक्षिका दोन पदे, कनिष्ठ सहाय्यक एक पद अशी तीन पदे रिक्त आहेत. तळा पंचायत समिती कार्यालयात विविध विभागात एकूण ३३ पदे रिक्त आहेत. ही पदे जिल्हा प्रशासनने लवकरात लवकर भरावीत, अशी नागरिकांची मागणी आहे. जेणेकरून पंचायत समितीचे विकासात्मक कामकाज सुरळीत चालेल. पंचायत समिती कार्यालयातून माहिती घेतली असता वरील माहिती प्राप्त झाली आहे.

Web Title: Lower thirty Panchayat vacancies vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.