सेंट्रल पार्कभोवती प्रेमीयुगलांचे चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:03 IST2019-05-19T00:03:14+5:302019-05-19T00:03:20+5:30

रहिवासी त्रस्त। उद्घाटनाच्या प्रतीक्षेतील उद्यान ग्रासले समस्यांनी

lovers around Central Park | सेंट्रल पार्कभोवती प्रेमीयुगलांचे चाळे

सेंट्रल पार्कभोवती प्रेमीयुगलांचे चाळे

नवी मुंबई : घणसोली येथील सेंट्रल पार्कच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबत चालल्याने त्या ठिकाणचा जॉगिंग ट्रॅक प्रेमीयुगलांसह गर्दुल्ल्यांचा अड्डा बनत चालले आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांची डोकेदुखी वाढत चालली असून, त्या ठिकाणी गैरप्रकार घडण्याची भीती वर्तवली जात आहे, तर रात्रीच्या वेळी रंगणाऱ्या दारू पार्ट्यानंतर रिकाम्या बाटल्या परिसरातील सोसायट्यांमध्ये फेकण्याचेही प्रकार घडत आहेत.


पालिकेच्या वतीने घणसोली येथे उभारण्यात आलेले सेंट्रल पार्क उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या पार्कच्या अंतर्गतचे काम तसेच बाहेरचा जॉगिंग ट्रॅक तयार होऊन अनेक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप ते नागरिकांच्या वापरासाठी खुले करण्यात आले नसल्याने त्या ठिकाणी नागरिकांची फारशी वर्दळ नसते. याचा फायदा घेत पार्कभोवतीच्या जॉगिंग ट्रॅकला प्रेमीयुगलांनी त्यांच्या गाठीभेटीचा अड्डा बनवला आहे. त्यानुसार दिवस-रात्र त्या ठिकाणी तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असतात, तर रात्रीच्या वेळी परिसरातील गर्दुल्ल्यांच्या दारूच्या पार्ट्या रंगत आहेत. हे दृश्य परिसरातील रहिवाशांच्या सातत्याने नजरेस पडत असल्याने लहान मुला-मुलींच्या मनावर परिणाम होत आहे. त्यामुळे सदर जॉगिंग ट्रॅकवरील अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी तिथल्या रहिवाशांकडून होत आहे. त्यांनी या संदर्भात अनेकदा पोलिसांसह पालिकेकडे तक्रारही केलेली आहे.

यानंतरही जोडप्यांसह गर्दुल्ल्यांना सेंट्रल पार्कभोवती मिळत असलेल्या मोकळीकबद्दल संशय व्यक्त होत आहे. परिणामी, भविष्यात त्या ठिकाणी गैरप्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: lovers around Central Park