उरणमध्ये सिलिंडरच्या स्फोटात वस्तूंचे नुकसान
By Admin | Updated: February 21, 2017 06:24 IST2017-02-21T06:24:52+5:302017-02-21T06:24:52+5:30
उरणमधील डाऊरनगर येथे रविवारी सकाळी ८ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने

उरणमध्ये सिलिंडरच्या स्फोटात वस्तूंचे नुकसान
उरण : उरणमधील डाऊरनगर येथे रविवारी सकाळी ८ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने खळबळ माजली. सुदैवाने स्फोटात जीवितहानी झाली नाही.
डाऊरनगर येथे चर्चच्या पाठीमागे राहणारे अर्जुन चंद्रकांत चव्हाण यांच्या घरी सकाळी सिलिंडरमध्ये गळती होऊन स्फोट झाला. यात जीवितहानी झाली नसली तरी घरातील सर्व वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)