शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

लोकलची कारला धडक

By admin | Updated: August 10, 2015 02:25 IST

रूळ ओलांडणाऱ्या कारला जुईनगर येथे शनिवारी रात्री ट्रेनची धडक बसली. कार ट्रेनसोबत काही अंतरापर्यंत घासत गेली. लोकल कारशेडकडे जात

नवी मुंबई : रूळ ओलांडणाऱ्या कारला जुईनगर येथे शनिवारी रात्री ट्रेनची धडक बसली. कार ट्रेनसोबत काही अंतरापर्यंत घासत गेली. लोकल कारशेडकडे जात असल्याने तिचा वेग कमी होता, त्यामुळे कारमधील महिला थोडक्यात बचावली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांचा जमाव गोळा होऊन तणाव निर्माण झाला होता. नेरूळकडून आलेली एक लोकल रात्री ९.३० च्या सुमारास कारशेडला जात होती. नेहमीप्रमाणे फाटक उघडे असल्याने वाहनांचीही ये- जा सुरूच होती. वाहनांना थांबण्याचा इशारा देण्यासाठी नेमलेला रेल्वे कर्मचारीही दूर बसला होता. रूळ ओलांडणाऱ्या एका कारच्या मागच्या बाजूला रेल्वेइंजीनचा बंपर धडकला. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी फाटक उभारण्याची मागणी संतप्त रहिवाशांनी केली आहे. जमावाने ही लोकल देखील सुमारे अर्धा तास अडवून धरली होती. अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर थांबवलेली लोकल कारशेडमध्ये पाठवण्यात आली.जुईनगर रेल्वे स्थानकालगत पश्चिमेला असलेल्या कारशेडचा मार्ग जीवघेणा ठरत आहे. फाटक नसल्याने रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहनांना रेल्वेची धडक लागून अपघात होतात. फाटक उभारण्याची गरज असतानाही रेल्वे प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जुईनगर सेक्टर ११ व २३ ला जोडणाऱ्या मार्गावरच हा रेल्वे रूळ आहे. कारशेडला जोडलेल्या या रुळामुळे ही दोन सेक्टर्स विभागली गेली आहेत. परंतु सानपाडा, जुईनगर व नेरूळ परिसराला जोडणारा हा सोयीचा मार्ग असल्यामुळे त्यावर सतत वर्दळ असते. पूर्वीचे रेल्वे फाटक जुने होऊन पडल्यानंतरही नवे फाटक बसवण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)