गण-गट वाढल्याने इच्छुकांची लॉबिंग
By Admin | Updated: November 8, 2014 22:55 IST2014-11-08T22:55:42+5:302014-11-08T22:55:42+5:30
कल्याण तालुक्यामध्ये पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांमध्ये भरघोस वाढ झाल्याने आगामी झेडपी निवडणुकांसाठी इच्छुकांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केली

गण-गट वाढल्याने इच्छुकांची लॉबिंग
वरपगाव : कल्याण तालुक्यामध्ये पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांमध्ये भरघोस वाढ झाल्याने आगामी झेडपी निवडणुकांसाठी इच्छुकांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केली असून पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याचा निर्धार अनेकांनी केला आहे. मागील आरक्षणात बदल होतील, या अपेक्षेने 13 नोव्हेंबर रोजी निघणा:या आरक्षणाच्या सोडतीकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.
कल्याण पंचायत समितीत पूर्वी 12 गण आणि 6 गट होते. 2क्11 च्या लोकसंख्येनुसार यामध्ये वाढ झाली. आता 26 गण आणि 13 गट वाढले. आता ठाणो जि.प. एससी, एसटी 15 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी कल्याण पंचायत समितीचा बेहरे गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होता. घोटसई (सर्वसाधारण), म्हारळ (सर्वसाधारण), दहागाव (ना.मा.प्र.), पिसवली (अनुसूचित जाती), गोवेली (सर्वसाधारण), आजदे (अ) (ना.मा.प्र.), आजदे (ब) (सर्वसाधारण स्त्री), नांदिवलीतर्फे (ना.मा.प्र. स्त्री), सोनारपाडा (सर्वसाधारण स्त्री), तर जिल्हा परिषद गट बेहरे- अनुसूचित जमाती, म्हारळ-अनुसूचित जाती स्त्री, पिसवली -अनुसूचित जमाती, आजदे-अनुसूचित जमाती स्त्री, सोनारपाडा- अनुसूचित जमाती स्त्री आणि निळजे - अनुसूचित जमाती स्त्री असे आरक्षण पडले होते. या वेळेस गट आणि गणांमध्ये दुपटी-तिपटीने वाढ झाल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. तसेच पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याचा निर्धार बहुतांश उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे बंडोबांना थंड करण्यात सर्वच पक्षांना जिकिरीचे प्रय} करावे लागणार आहेत. 13 नोव्हेंबर रोजी होणा:या आरक्षण सोडतीकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. (वार्ताहर)