शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा विद्यार्थ्यांसाठीची कर्ज योजना कागदावरच; वर्षानंतरही अंमलबजावणी नाही!

By नामदेव मोरे | Updated: June 18, 2024 07:54 IST

४० लाखांपर्यंत कर्जावरील व्याजमाफीची तरतूद.

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून एक वर्षापूर्वी देशांतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बँकांच्या माध्यमातून ४० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता. या कर्जावरील व्याज माफ करण्यात येणार होते. जून २०२३ मध्ये ही योजना प्रत्यक्षात सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, लालफितीच्या कारभारामुळे अजून त्याचा अधिकृत अध्यादेश निघू शकलेला नाही. मराठा समाजाच्या विकासासाठी स्थापन झालेल्या या महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जावरील व्याज परताव्याच्या स्वरुपात महामंडळ भरत असते.

महामंडळाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचे. लाभार्थ्यांनी कर्जाची रक्कम भरावी व व्याज महामंडळ भरेल, अशी ही योजना होती. देशांतर्गत शिक्षण घेण्यासाठी जास्तीत जास्त ४० लाख रुपयांपर्यंत कर्जाची तरतूद होती. एप्रिल २०२३ मध्ये महामंडळाने याविषयी प्राथमिक निर्णय घेतला. त्याविषयी पुढील सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून जून २०२३ पासून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्याचे विचाराधीन होते. पण एक वर्षानंतरही ही योजना अस्तित्वात आलेली नाही.

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही ही योजना प्रत्यक्षात सुरू होऊ शकली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे एक चांगली योजना लालफितीमध्ये अडकून पडल्याची टीका त्यांनी केली आहे. महामंडळाचे कामकाज उत्तम सुरू आहे. लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. यामुळे काही जुने कर्मचारीच अनेक अडचणी निर्माण करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणStudentविद्यार्थी