शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य झालंय लॉक, पेट्रोल दरवाढ अनलॉक; इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्कील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 10:09 IST

रेल्वे व बस प्रवास सामान्य नागरिकांसाठी बंद केला आहे. यामुळे घरापासून कामावर जाण्यासाठी दुचाकीचा वापर वाढला आहे.

नामदेव मोरे -

नवी मुंबई : कोरोनामुळे उत्पन्न ठप्प झाले असून, खर्चामध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तीन दशकांमध्ये पेट्रोल दरामध्ये तब्बल ८३ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे दुचाकी सामान्य नागरिकांसाठी ओझे ठरत असून इंधनदरवाढीमुळे जगणे मुश्कील झाले आहे.           रेल्वे व बस प्रवास सामान्य नागरिकांसाठी बंद केला आहे. यामुळे घरापासून कामावर जाण्यासाठी दुचाकीचा वापर वाढला आहे. पूर्वी घर ते स्टेशनपर्यंत दुचाकीचा वापर करणारे नागरिकांना मुंबई, ठाणे व एमआयडीसीतील कार्यालयापर्यंत दुचाकीनेच जावे लागत आहे. परंतु पेट्रोलचे दर वाढल्यामुळे इंधनावरील खर्च आवाक्याबाहेर जावू लागला आहे. अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे, तर काहींना नोकरी गमवावी लागली आहे.  अशा स्थितीमध्ये दुचाकी ओझे वाटू लागले आहे. १९९१ मध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर १४.६२ रुपये होते. आता हेच दर ९८.३६ वर पोहचले आहेत. तब्बल ८३ रुपयांची वाढ झाली आहे. शासनाने इंधनावरील कर कमी करावे, अशी मागणी होत आहे. 

पुन्हा सायकलवर फिरावे लागणार -फायनान्स कंपनीमध्ये काम करत असून ग्राहकांना सेवा देण्यासाठी दिवसभर शहरात फिरावे लागत असल्याने दुचाकीचा वापर करावा लागतो. कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाला असून, खर्च मात्र वाढत आहे. पेट्रोलवरील खर्चही वाढत असून, आता पुन्हा दुचाकी सोडून सायकल वापरायची वेळ आली आहे.- सचिन पवार, नेरूळ 

पूर्वी घरापासून रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी दुचाकीचा वापर करत होतो. पेट्रोलदर वाढल्यामुळे वाहनाचा वापर करणे परवडत नसल्यामुळे चालतच रेल्वे स्टेशनला जातो. इंधनही वाचते व व्यायामही होतो.- महेश पाटील, सीवूड 

एमआयडीसीमध्ये कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही. यामुळे दुचाकीचा वापर करावा लागत आहे. पेट्रोलचे दर वाढले असल्यामुळे इंधनावरील खर्च वाढत आहे. जेवणापेक्षा इंधनावर जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.- संदीप शेडगे, सानपाडा

तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्सच जास्तएक लिटर पेट्रोल ग्राहकांना ९८.३६ रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. वास्तविक त्याची मूळ किंमत जवळपास ३५ ते ३६ रुपये आहे. विविध टॅक्समुळे त्याची किंमत वाढत आहे. इंधनावर जवळपास ६४ टक्के कर असून, त्यामध्ये २४ टक्के केंद्र व उर्वरित ४० टक्के राज्य सरकारचे कर आहेत. आयात शुल्क, व्हॅट, वाहतूक खर्च, उत्पादनशुल्क, डिलर कमीशन व इतर कर आकारले जात असून, त्याचा सर्व भार ग्राहकांना सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपNavi Mumbaiनवी मुंबई