तरुणींना दिले स्वसंरक्षणाचे धडे
By Admin | Updated: March 8, 2017 04:39 IST2017-03-08T04:39:24+5:302017-03-08T04:39:24+5:30
पनवेलमधील पिल्लेज कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय शाओलीन वारीयर कुंग फू असोसिएशनच्या वतीने स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाकरिता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात

तरुणींना दिले स्वसंरक्षणाचे धडे
नवी मुंबई : पनवेलमधील पिल्लेज कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय शाओलीन वारीयर कुंग फू असोसिएशनच्या वतीने स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाकरिता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीचे प्रकार, तसेच स्वत:चे संरक्षण करिता प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महाविद्यालयातील १८ विद्यार्थिनी या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.
महाविद्यालयीन तरुणींना प्रसंगानुरूप स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. यामध्ये समोरून एखादा वार झाल्यास त्याला कशाप्रकारे उत्तर द्यावे, याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महिलांनी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्याकरिता महिलांवर होणाऱ्या अन्यायावर लढा देण्याकरिता योग्य प्रशिक्षणाची गरज असल्याची प्रतिक्रिया आयोजक किमया परजणे यांनी व्यक्त केली. यापूर्वीही खारघरमध्ये ८० विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण दिल्याचेही परजणे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थिनींबरोबरच शिक्षिकांनीही प्रशिक्षण घेतले.