विमानतळबाधित पुनर्वसन योजनेच्या भूखंडांची सोडत
By Admin | Updated: March 17, 2017 05:56 IST2017-03-17T05:56:19+5:302017-03-17T05:56:19+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या गावठाण आणि गावठाणाबाहेरील बांधकामांच्या मोबदल्यात पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत

विमानतळबाधित पुनर्वसन योजनेच्या भूखंडांची सोडत
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या गावठाण आणि गावठाणाबाहेरील बांधकामांच्या मोबदल्यात पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत गुरुवारी भूखंडवाटपाची सोडत काढण्यात आली. या सोडतीचा संपूर्ण तपशील सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
गुरुवारी झालेल्या सोडतीद्वारे चिंचपाडा, कोपर, वाघिवली, वाडा, वरचे ओवळा, उलवे, तरघर, कोंबडभुजे व गणेशपुरी या गावांतील बांधकामधारकांना भूखंडांचे क्रमांक निश्चित करण्यात आले. या वेळी १0५ ब्लॉक्सची सोडत काढण्यात आली. यात चिंचपाडा, कोल्ही, कोपर, वाघिवली, वाडा व वरचे ओवळे या गावांतील ४४ ब्लॉक्सचा तर उलवे, तरघर, कोंबडभुजे व गणेशपुरी गावांतील ४८ ब्लॉक्सचा समावेश आहे. या सोडतीला पर्यवेक्षण समितीचे सदस्य म्हणून निवृत्त न्यायाधीश सुभाष धर्माधिकारी, माजी मुख्य अभियंता बी.के. शमी, माजी सामाजिक सेवा अधिकारी रीमा दीक्षित व पत्रकार मनोज जालनावाला उपस्थित होते. (प्रतिनिधी)