कोपरखैरणे पोस्ट कार्यालयाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 02:09 IST2016-07-05T02:09:37+5:302016-07-05T02:09:37+5:30

कोपरखैरणे पोस्ट कार्यालयाच्या छताला गळती लागली आहे. कार्यालयाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कागदपत्रे भिजू नयेत यासाठी त्यावर प्लास्टीकचा कागद टाकण्यात आला

Leakage to Koparkhairane Post Office | कोपरखैरणे पोस्ट कार्यालयाला गळती

कोपरखैरणे पोस्ट कार्यालयाला गळती

नवी मुंबई : कोपरखैरणे पोस्ट कार्यालयाच्या छताला गळती लागली आहे. कार्यालयाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कागदपत्रे भिजू नयेत यासाठी त्यावर प्लास्टीकचा कागद टाकण्यात आला असून गळक्या छताखाली बसून कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.
सिडकोने बांधलेल्या मार्केटच्या पहिल्या मजल्यावर पोलीस स्टेशन व पोस्ट कार्यालयाला जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोस्ट कार्यालयाच्या छताला गळती लागली आहे. कार्यालयात सर्वत्रच पाणी येत असल्याने कर्मचाऱ्यांना बसण्यासाठीही जागा शिल्लक नाही. सर्व कागदपत्रे टेबलवर ठेवून त्यावर प्लास्टीकचा कागद ठेवण्यात आला आहे. कार्यालयाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून त्यामध्ये बसून कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामे करावी लागत आहेत. स्लॅब कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्याही क्षणी इमारतीचा भाग कोसळून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री स्लॅब कोसळला तर सर्व कागदपत्रे भिजून जाणार आहेत.
पोस्ट कार्यालयाची इमारत दुरूस्त करण्याकडे सिडको व पोस्ट विभाग दुर्लक्ष करत आहेत. पहिल्या मजल्यावर येणाऱ्या जिन्याची स्थिती दयनीय झाली आहे. स्लॅबचा काही भाग कोसळला आहे. उर्वरित स्लॅबही येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडण्याची शक्यता आहे. पोस्ट कार्यालयातील कामगारांच्या समस्येकडे सर्वच दुर्लक्ष करत आहेत. कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या बाहेरील बाकड्यांवर दुपारी जेवण करावे लागत आहे. लवकरात लवकर दुरूस्तीचे काम करावे किंवा कार्यालयाचे इतर ठिकाणी स्थलांतर करावी, अशी मागणी कर्मचारी व नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Leakage to Koparkhairane Post Office