पनवेलमध्ये मेट्रो सेंटरचा शुभारंभ
By Admin | Updated: July 3, 2014 03:10 IST2014-07-03T03:10:44+5:302014-07-03T03:10:44+5:30
विमानतळबाधितांना २२.५ टक्के योजनेअंतर्गत भूखंड देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने सिडकोच्या माध्यमातून नवीन पनवेल येथे स्वतंत्र मेट्रो सेंटर सुरू करण्यात येत आहे

पनवेलमध्ये मेट्रो सेंटरचा शुभारंभ
नवी मुंबई : विमानतळबाधितांना २२.५ टक्के योजनेअंतर्गत भूखंड देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने सिडकोच्या माध्यमातून नवीन पनवेल येथे स्वतंत्र मेट्रो सेंटर सुरू करण्यात येत आहे. या मेट्रो सेंटरचे उद्या सकाळी ११.३0 वाजता सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, व्ही.राधा, आमदार विवेक पाटील, आमदार प्रशांत ठाकूर तसेच कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, सुमंत भांगे उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)