लोकलमध्ये राहिलेला लॅपटॉप केला परत

By Admin | Updated: October 15, 2016 06:55 IST2016-10-15T06:55:55+5:302016-10-15T06:55:55+5:30

राजस्थान येथे राहणारा किन्सुक जैन हा तरुण मुंबईत आल्यानंतर सानपाडा येथे राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी सीएसटी पनवेल लोकलमधून जात होता.

The laptop in the local area was returned | लोकलमध्ये राहिलेला लॅपटॉप केला परत

लोकलमध्ये राहिलेला लॅपटॉप केला परत

पनवेल : राजस्थान येथे राहणारा किन्सुक जैन हा तरुण मुंबईत आल्यानंतर सानपाडा येथे राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी सीएसटी पनवेल लोकलमधून जात होता. उतरताना किन्सुक रॅकवर ठेवलेली लॅपटॉपची बॅग घेण्यास विसरला. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम माने हे याच लोकलने कामावर जात होते. त्यांना लॅपटॉपचे बॅग दिसली. त्यांनी तत्काळ रेल्वेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती दिली. माने यांनी बॅग तपासणी केली असता, लॅपटॉप आढळला. त्यातील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, बॅग किन्सुक जैन (२८) याची असल्याचे समजले. त्यानंतर जैन यांना पनवेलला बोलावून लॅपटॉपसह बॅग परत करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: The laptop in the local area was returned