शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

नवी मुंबईत वर्षभरात २५.७८ कोटींचा मुद्देमाल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 00:35 IST

६ कोटी ८६ लाखांचा माल जप्त

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून वर्षभरात २५ कोटी ७८ लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यापैकी ६ कोटी ८६ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित १९ कोटींचा ऐवज चोरट्यांनी हडप केल्याने तो पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षात वेगवेगळ्या स्वरूपाचे एकूण ४ हजार ३३१ गुन्हे घडले आहेत. त्यापैकी १ हजार ७८२ गुन्हे मालमत्तेशी संबंधित आहेत. पनवेल व उरण परिसरात घरफोडी, चोरी, सोनसाखळी चोरी व वाहन चोरी अशा मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांत सातत्याने वाढ होत आहे.

वर्षभरात घरफोडीच्या ३०१ घटना घडल्या आहेत. त्यापैकी २६५ घरफोडी रात्री झालेल्या असून त्यामध्ये तब्बल ४ कोटी ९० लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लुटला आहे. पोलिसांनी घडलेल्या एकूण गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ७१४ गुन्ह्यांची उकल शिताफीने केली आहे. मात्र गुन्हेगारांना अटक करूनही त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना फारसे यश आले नाही. त्यामुळे २५.७८ कोटींच्या ऐवजापैकी केवळ ६ कोटी ८६ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस जप्त करू शकले आहेत. त्यात चोरीला गेलेल्या ७८० पैकी २६० वाहनांचा समावेश आहे. उर्वरित ऐवज हा रोख रक्कम व दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपातील आहे. 

सन २०१९ मध्ये मालमत्तेचे २ हजार २६० गुन्हे घडले होते. त्यामध्ये एकूण २८.९२ कोटींचा ऐवज चोरीला गेला होता. त्यापैकी ८६१ गुन्ह्यांची उकल करून ९ कोटी २२ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला होता. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांची संख्या घटली आहे. परंतु चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याचे प्रमाण घटल्याने तब्बल १८ कोटी ९२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलेले नाही.

लॉकडाऊनमध्ये घटतीन महिने पूर्णपणे लॉकडाऊनमध्येच गेल्याने या कालावधीत गुन्ह्यांची संख्या काही प्रमाणात घटली होती. मात्र अनलॉक होताच पुन्हा गुन्ह्यांचा आलेख वाढला आहे. त्यानुसार गतवर्षात मालमत्तेशी संबंधित एकूण १ हजार ७८२ गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये दरोडा, सोनसाखळी चोरी, घरफोडी व वाहन चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांमध्ये एकूण २५ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी