कर्जतमधील तलाव होणार गाळमुक्त

By Admin | Updated: June 1, 2016 02:47 IST2016-06-01T02:47:12+5:302016-06-01T02:47:12+5:30

उन्हाळा सुरू झाला की तालुक्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर उपाययोजना म्हणून तहसील कार्यालयाने प्रत्येक गावात जे पारंपरिक तलाव आहे

The lake in Karjat will be free from the slums | कर्जतमधील तलाव होणार गाळमुक्त

कर्जतमधील तलाव होणार गाळमुक्त

कर्जत : उन्हाळा सुरू झाला की तालुक्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर उपाययोजना म्हणून तहसील कार्यालयाने प्रत्येक गावात जे पारंपरिक तलाव आहे, त्या तलावातील गाळ काढून त्या तलावाची खोली, लांबी, रु ंदी वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. उपविभागीय अधिकारी (प्रांत) दत्ता भडकवाड यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून या तलावाचा गाळ लोकसहभागातून काढला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी दिली.
उन्हाळ्यात वाड्यापाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून कर्जत तहसील कार्यालयाने ज्या गावात पारंपरिक तलाव आहेत त्या तलावाचा गाळ काढणे, त्याची खोली, लांबी, रु ंदी वाढविण्याचे कामे हाती घेतली आहेत. यामुळे या पावसाळ्यात या तलावात मुबलक पाणीसाठा होईल. त्यामुळे उन्हाळ्यात गुराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल आणि गाववाले सुध्दा पाण्याचा वापर करू शकतील. कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीत आंबिवली गाव आहे. या गावात सुमारे ८० घरांची वस्ती आहे. या गावात दोन एकरांमध्ये पारंपरिक तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता. त्यामुळे तलावाची खोली, लांबी, रु ंदी कमी झाली होती. आतमध्ये बेशरम झाडांनी अतिक्रमण केले होते. या तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचा निर्णय तहसीलदार रविंद्र बावीस्कर यांनी घेतला. आणि याच गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक सावंत यांना यासाठी प्रयत्न के ले. तलावातील गाळ काढण्यासाठी तीन जेसीबी यंत्रे लावली आणि काढलेला गाळ उचलून हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठी तीन डंपर लावले. या तलावातून सुमारे एक हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे.
गाळ काढल्याने तलावाची खोली, लांबी, रु ंदी वाढली आहे. त्यामुळे पावसाळ्यात तलावामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होणार आहे. तलावातील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्याने त्यांना शेतीसाठी फायदा होणार आहे. हे काम लोकांच्या सहभागातून करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा पैसा वाचला आहे आणि हे काम गावकीचे असल्याने ग्रामस्थांनी त्यासाठी सहकार्य केले. तलावातील गाळ काढताना अशोक सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश खेडेकर, ग्रामसेवक ए. एल. भानवसे, ग्रामपंचायत सदस्य किरण पारधी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. हे काम चालू असताना प्रांत दत्ता भडकवाड, तहसीलदार रवींद्र बाविस्कर, अव्वल कारकून किरण पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: The lake in Karjat will be free from the slums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.