खारघर स्थानकात सुविधांचा अभाव
By Admin | Updated: November 2, 2015 02:10 IST2015-11-02T02:10:09+5:302015-11-02T02:10:09+5:30
नवी मुंबईमधील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे खारघर रेल्वे स्थानक सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत

खारघर स्थानकात सुविधांचा अभाव
पनवेल : नवी मुंबईमधील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे खारघर रेल्वे स्थानक सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या रेल्वे स्थानकातून दररोज ४० ते ४५ हजार प्रवासी ये-जा करतात. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून स्थानकातील समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने रेल्वेचे मंडळ वाणिज्य प्रबंधक व्ही. ए. मिलनरॉय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खारघर रेल्वे स्थानकात पूर्ण वेळ स्टेशन मास्तर नाही. तिकीट खिडक्यांजवळ इंडिकेटर नाही, बंद असलेल्या तिकीट खिडक्या, फलाटावरील बंद असलेले पंखे, लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी आरक्षणाची व्यवस्था नाही, अस्वच्छता असे विविध प्रश्न प्रवाशांना येथे भेडसावत
आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, खारघर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आकडेवारीनुसार, रेल्वेला याठिकाणाहून दीड ते दोन कोटींचे उत्पन्न मिळते. तरी देखील अनेक वर्षांपासून या समस्या ‘जैसे थे’ असल्याची प्रतिक्रि या खारघरचे शिवसेना उपविभाग प्रमुख रामचंद्र देवरे यांनी दिली.
या समस्या सोडविण्याचे निवेदन रेल्वेच्या मंडळ वाणिज्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे देवरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख वासुदेव घरत, शाखा प्रमुख हरिश्चंद्र वारंग, रमेश सावंत, नितीन कचरे, उत्तम मोर्बेकर, हरी कांबळे आदी कार्यक र्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)