शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या सप्टेंबरपर्यंत, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 06:33 IST

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जातात.

नवी मुंबई : विशेष बाब म्हणून होळीसाठी सुरू करण्यात आलेल्या नागपूर-मडगाव जंक्शन नागपूर या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांची सेवा सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. यापूर्वी ही सेवा ३१ मार्चपर्यंत निर्धारित केली होती. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने या सेवेचा ९ जूनपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जातात. विशेषत: सणासुदीच्या दिवसांत विविध मार्गांवर अतिरिक्त गाड्या चालवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून होळीसाठी विशेष बाब म्हणून नागपूर - मडगाव जंक्शन (०११३९) आणि  मडगाव जंक्शन - नागपूर  (०११४०) या द्वि-साप्ताहिक गाड्या चालविल्या जात आहेत. ३१ मार्चपर्यंत या गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने जाहीर केला होता. परंतु, आता त्या ९ जूनपर्यंत चालविल्या जाणार आहेत.

सुधारित वेळापत्रकानुसार नागपूर - मडगाव जंक्शन ही गाडी ३ एप्रिल ते ८ जून या दरम्यान आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच बुधवारी आणि शनिवारी धावणार आहे, तर मडगाव जंक्शन - नागपूर ही विशेष गाडी ४ एप्रिल ते ९ जून या कालावधीत पावसाचे दिवस वगळता प्रत्येक गुरूवारी आणि रविवारी असे आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.

मान्सूनमध्ये गाड्यांचे नियाेजन जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते. त्यामुळे या काळातसुद्धा नागपूर - मडगाव जं. - नागपूर मार्गावर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. या गाड्या १२ जून ते ३० जून दरम्यान धावणार आहेत. नागपूर -मडगाव जंक्शन (०११३९) ही द्वि-साप्ताहिक विशेष गाडी नागपूर येथून बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३:०५ मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:४५ वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. त्याचप्रमाणे मडगाव जंक्शन - नागपूर ही द्वि-साप्ताहिक गाडी १३  ते ३० जून या कालावधीत गुरूवारी, रविवारी सायं. ७ वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९:३० वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी वर्धा जंक्शन, पुलगाव, शेगाव, मलकापूर, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, करमाळीसह अन्य स्थानकांवर थांबेल. 

टॅग्स :railwayरेल्वे