कोल्हापूर टाईप बंधारे ठरताहेत वरदान
By Admin | Updated: December 11, 2015 01:21 IST2015-12-11T01:21:37+5:302015-12-11T01:21:37+5:30
तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे

कोल्हापूर टाईप बंधारे ठरताहेत वरदान
कर्जत : तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे. कोंढाणेपासून अंबिवलीपर्यंत आणखी सहा मोठे सिमेंट बंधारे बांधण्याचे पाटबंधारे विभागाचे प्रयोजन आहे.
कर्जत तालुक्यात वाहणारी उल्हास नदी सुरुवातीच्या टप्प्यात उन्हाळ्यात कोरडी असते. पुढे पेज नदीचे पाणी उल्हास नदीमध्ये जावून मिळते. त्यानंतर उल्हास नदी कल्याण खाडीपर्यंत जात असताना बारमाही होते. मात्र कोंढाणेच्या भागातील जंगलात उगम झालेल्या या उल्हास नदीचे पात्र पाणी कुठेही अडविले गेले नसल्याने उन्हाळ्यात कोरडे पडते. त्यामुळे सुरु वातीपासून या भागातील शेतकरी उन्हाळ्यात प्रचंड संकटात होते. सालपे, कोंदीवडे अशी पुढे तमनाथ भागात येणारी उल्हास नदी कोरडी असल्याने स्थानिक लोक पिण्याच्या पाण्यासाठी त्रासात असायचे, मात्र पाटबंधारे विभागाने कोंढाणेपासून चांदईपर्यंत मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम केले, त्याचा परिणाम चांगला होऊन उन्हाळ्यात कोरडे असलेले उल्हास नदीचे पात्रपाणी साठ्यामळे भरु न गेले आहे.
दुसरीकडे आणखी काही जागा आहे, तेथे पूर्वीचे सिमेंट बंधारे आहेत, परंतु ते मोडकळीस आले आहेत. अशा काही ठिकाणी भरपूर पाणी साठा होऊ शकतो. त्यामुळे प्राधान्याने त्या ठिकाणी सिमेंट बंधारे बांधणे गरजेचे झाले आहे. कर्जत पाटबंधारे विभागाने अशा काही साईट शोधून ठेवल्या होत्या आणि तेथे सिमेंट बंधारे बांधण्याचे नियोजन देखील होते. मात्र कोंढाणेपासून चांदई-अंबिवलीपर्यंत सहा ठिकाणी बांधले जाणारे सिमेंट बंधारे गेली अनेक महिने प्रस्तावित आहेत. त्यांची कामे सुरु केल्यास उल्हास नदीच्या कोरड्या पात्रात झालेली जलक्र ांती सर्व परिसराच्या पाणीदृष्ट्या फायद्याची ठरेल. (वार्ताहर)