अल्पवयीन मुलीचे नेरळ येथून अपहरण
By Admin | Updated: September 22, 2015 03:46 IST2015-09-22T03:46:42+5:302015-09-22T03:46:42+5:30
कशेळे ग्रामपंचायतीमधील कवठेवाडीतील वसंत पांडू कवठे यांची अल्पवयीन मुलगी नेरळ एसटी स्टॅण्ड येथून हरवली होती. तिला नेरळ जवळ असलेल्या ममदापुरवाडी मधील तरु णाने पळवून नेल्याची

अल्पवयीन मुलीचे नेरळ येथून अपहरण
नेरळ : कशेळे ग्रामपंचायतीमधील कवठेवाडीतील वसंत पांडू कवठे यांची अल्पवयीन मुलगी नेरळ एसटी स्टॅण्ड येथून हरवली होती. तिला नेरळ जवळ असलेल्या ममदापुरवाडी मधील तरु णाने पळवून नेल्याची तक्र ार नेरळ पोलीस ठाणे येथे दाखल झाली आहे.
शनिवारी (१९ सप्टेंबर) सायंकाळी कशेळे ग्रामपंचायतमधील कवठेवाडीतील वसंत कवठे यांची मुलगी नेरळ येथे एसटी स्ॅटण्डवर घरी परत येण्यासाठी निघाली होती. त्यावेळी ममदापुरवाडी येथील दीपक अनंता निरगुडे याने दोन मित्रांच्या मदतीने त्या अल्पवयीन तरु णीला फूस लावून मिनीडोअर रिक्षामधून उतरवून तेथून नेले. मुलगी घरी आली नाही म्हणून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न रात्री सुरु केल्यानंतर मिनीडोअर रिक्षामध्ये बसलेली असतांना ममदापुरवाडीतील काही मुलांनी तिला उतरविले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वसंत कवठे हे कशेळे येथील काही लोकांसह नेरळ येथे मध्यरात्री पोहचले. त्यांनी प्रथम ममदापुरवाडी येथे जावून निरगुडे यांच्याकडे मुलीची चौकशी केली. मात्र तेथून कवठे यांना काहीही माहिती मिळाली नाही.
शेवटी कवठे यांनी मध्यरात्री दिड वाजता नेरळ पोलीस स्टेशन गाठले. तेथे वसंत कवठे यांनी मुलीच्या अपहरण प्रकरणी दीपक निरगुडे याच्यावर तसेच त्याला मदत करणारे दशरथ निरगुडे आणि रु पेश चौधरी यांच्यावर तक्र ार नोंद केली. नेरळ पोलीस तपास करीत आहेत. निरगुडे आणि कवठे यांच्यात तडजोड झाल्यामुळे तरु णावर दंडात्मक कारवाई झाली नाही.
(वार्ताहर)