खारघरमध्ये आयुक्तांशी घातली हुज्जत

By Admin | Updated: February 22, 2017 04:33 IST2017-02-22T04:33:09+5:302017-02-22T04:33:09+5:30

खारघर शहरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविताना एका हॉटेल मालकाने आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याशी

In Kharghar, the Commissioner is attached to the Commissioner | खारघरमध्ये आयुक्तांशी घातली हुज्जत

खारघरमध्ये आयुक्तांशी घातली हुज्जत

पनवेल : खारघर शहरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविताना एका हॉटेल मालकाने आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याशी हुज्जत घातली. खारघर येथील हिरानंदानी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चायनीझच्या गाड्या लागतात. मंगळवारी आयुक्त याठिकाणी कारवाई करण्यासाठी गेले असता खान नामक व्यक्तीने आयुक्तांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्यात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे.
अनेक ठिकाणी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे हे स्वत: घटनास्थळी जाऊन कारवाई करतात. मात्र अनेक जण त्यांच्याशी वाद घालतात. या घटनेससंदर्भात आयुक्तांनी दु:ख व्यक्त करीत सांगितले, की ‘मी माझे काम प्रामाणिकपणे करीत आहे. त्यामुळे अनेकाचे हितसंबंध दुखावले जातात. म्हणून असे प्रकार घडतात.’ (प्रतिनिधी)

Web Title: In Kharghar, the Commissioner is attached to the Commissioner