शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

सिडकोच्या विरोधात खारघर बंद, सर्वपक्षीय नेत्यांसह रहिवासी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 4:35 AM

सिडकोने अनधिकृत धार्मिक स्थळांवर तोडक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. शुक्र वारी सिडकोने कळंबोली शहरातील १३ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केल्यानंतर

पनवेल : सिडकोने अनधिकृत धार्मिक स्थळांवर तोडक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. शुक्र वारी सिडकोने कळंबोली शहरातील १३ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केल्यानंतर, सोमवारी मोर्चा खारघर शहराकडे वळवणार असल्याचे कळल्यानंतर याविरोधात खारघरमधील नागरिक व सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ रविवारी संपूर्ण खारघर बंदची हाक दिली होती. शहरातील सर्व रिक्षा, टेम्पो संघटना, व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.खारघर शहरातील १५ धार्मिक स्थळांना तोडण्यासंदर्भात सिडकोने संबंधितांना नोटिसा बजावलेल्या आहेत. या कारवाईविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शनिवारी एकत्रित बैठक घेऊन या कारवाई विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी या कारवाईच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सेक्टर ७, २१, १९, १२, या वर्दळीच्या ठिकाणी बंद यशस्वी झाला. तसेच शहरातील रिक्षाचालक, टेम्पोचालक संघटनादेखील या बंदमध्ये सहभागी झाल्याने शहरात प्रवाशांचे हाल झालेले पाहावयास मिळाले.रविवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन शहरात निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चात शेकडोंच्या संख्येने शहरातील नागरिक, विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सत्ताधारी भाजपा पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकाºयांनी या बंदमध्ये सक्रि य सहभाग घेतला आहे. सोमवारी सिडकोच्या कारवाईच्या निषेधार्थ ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा भाजपाचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख गुरु नाथ पाटील यांनी दिला आहे.शहरात सिडकोने मंदिरासाठी राखीव भूखंड ठेवले नसल्याने खारघरमधील रहिवाशांनी आपल्या श्रद्धेपोटी धार्मिक स्थळे उभारली आहेत. अनेक वर्षांपासून ही स्थळे शहरातील नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखली जात असताना सिडकोने ती अनधिकृत ठरवली असल्याचा आरोप शेकाप नगरसेवक गुरु नाथ गायकर यांनी केला आहे. याविरोधात खारघरवासीय सिडकोचा निषेध करीत असल्याचे गायकर यांनी सांगितले.शहरात रविवारी कायदा व्यवस्था बिघडू नये, म्हणून सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन त्यांना कायदा हातात न घेण्याची विनंती केली. या वेळी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नीलेश बाविस्कर, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, खारघर भाजपा अध्यक्ष ब्रिजेश पटेल, संतोष तांबोळी आदींसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.