खारगाव भवानी देवी उत्सवात भाविकांची मांदियाळी

By Admin | Updated: February 20, 2016 02:02 IST2016-02-20T02:02:11+5:302016-02-20T02:02:11+5:30

अलिबाग: रोहा तालुक्यातील खारगाव येथे भवानी देवीचा वार्षिक उत्सव गुरुवारी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Khardgaon Bhavani Devi festival celebrates the festival of devotees | खारगाव भवानी देवी उत्सवात भाविकांची मांदियाळी

खारगाव भवानी देवी उत्सवात भाविकांची मांदियाळी

अलिबाग: रोहा तालुक्यातील खारगाव येथे भवानी देवीचा वार्षिक उत्सव गुरुवारी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी या उत्सव सोहळ्यात हजर राहून देवीच्या पालखीचे दर्शन घेतले. सकाळी ७ ते ९ या दरम्यान देवीला अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. दुपारच्या सत्रात कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कीर्तन सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री गावातील मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन केले होते. यावेळी खारगाव ग्रामस्थ, जयभवानी युवक मंडळ आदींनी परिश्रम घेतले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Khardgaon Bhavani Devi festival celebrates the festival of devotees