खब:यांच्या नेटवर्कने गुन्हेगारीला बसला चाप

By Admin | Updated: November 13, 2014 00:44 IST2014-11-13T00:44:54+5:302014-11-13T00:44:54+5:30

खब:यांची पक्की माहिती आणि त्यानुसार लावलेले सापळे यातून नवी मुंबई पोलिसांनी 9 जबरी दरोडय़ाचे प्रयत्न उधळून लावले.

Khab: The network of crime sat in crime | खब:यांच्या नेटवर्कने गुन्हेगारीला बसला चाप

खब:यांच्या नेटवर्कने गुन्हेगारीला बसला चाप

सूर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबई
खब:यांची पक्की माहिती आणि त्यानुसार लावलेले सापळे यातून नवी मुंबई पोलिसांनी 9 जबरी दरोडय़ाचे प्रयत्न उधळून लावले. यात  9 टोळ्यांमधील 4क् सराईत गुन्हेगारांना गजाआड केले. एकेकाळी गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून ओळख बनलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला खब:यांच्या मजबूत नेटवर्कमुळे गुन्हेगारीला चाप बसवून हा शिक्का पुसण्यास यश आले आहे. 
 दोन वर्षापूर्वी शहरात भरदिवसा घरफोडय़ा, जबरी दरोडे, हत्या अशा घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र गेल्या वर्षभरापासून आयुक्त म्हणून एल. के. प्रसाद यांनी चार्ज घेतल्यानंतर गुन्हेगारीला चाप बसला आहे.
आयुक्तच न्यायप्रिय असल्याने विद्यमान उपआयुक्तांनाही कार्यक्षमता दाखवण्याची संधी आलेली आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या 9 टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त शहाजी उमाप व परिमंडळ 2 चे उपआयुक्त संजय येनपुरे यांच्या नेतृत्वाखाली या कारवाया झालेल्या आहेत. पेट्रोलपंप, बँका, ज्वेलर्सवर पडणारे दरोडे उधळून सुमारे 4क् जणांना अटक केली. गुन्हेगारांकडून पिस्तूल, तलवारी अशी शस्त्रेही जप्त करण्यात आली.  त्याव्यतिरिक्त एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न, घरफोडीचे कटही पोलिसांनी खब:यांच्या माहितीनुसार हाणून पाडलेले आहेत. 
खब:यांचे नेटवर्क सक्षम झाल्याने नवी मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमाही स्वच्छ होत आहे. गुन्हेगारांमधलेच खबरे निर्माण करण्यासाठी पोलिसांनाही आपली विश्वासार्हता सिध्द करावी लागते.  मात्र खब:यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यात सध्याचे बहुतांश अधिकारी अव्वल आहेत. 
अनेकवेळा गंभीर आणि क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यासाठी खब:यांची माहिती फायदेशीर ठरत असल्याचे गुन्हेशाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी).
 
1नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी गुलाबराव पोळ व अशोक शर्मा यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांनी सर्वाधिक डोके वर काढले. अधिकारी, कर्मचारी यांच्यावरच त्यांचा वचक नव्हता त्यामुळे अनेक गुन्ह्याचे तपासही रेंगाळले होते. 
2जावेद अहमद हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होताच प्रशासकीय यंत्रणा सुधारली, मात्र गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश बसलेला नव्हता. अखेर गेल्या वर्षभरात नवी मुंबईतील गुन्हेगारी काही प्रमाणात नियंत्रित झाली. 
 
3पोलीसांच्या मोहीमेमुळे गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या गुन्हेगारांसह सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यामुळे शहरात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. पोलीस आयुक्तपदी के. एल. प्रसाद यांची वर्णी लागल्याने हा बदल शक्य झाल्याचे पोलीस अधिका:यांचेच म्हणणो आहे.

 

Web Title: Khab: The network of crime sat in crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.