खारघरमध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:23 IST2017-07-29T02:22:57+5:302017-07-29T02:23:00+5:30

खारघर शहराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागलेले आहे. महागड्या गाड्या, दुचाकी, अवजड वाहनांची शहरात नेहमीच वर्दळ असते. असे असले तरी खारघर वाहतूक पोलीस शाखा अद्याप वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या प्रतीक्षेत आहे

khaaragharamadhayae-vaahatauuka-paolaisa-nairaikasaka-naahai | खारघरमध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक नाही

खारघरमध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक नाही

पनवेल : खारघर शहराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागलेले आहे. महागड्या गाड्या, दुचाकी, अवजड वाहनांची शहरात नेहमीच वर्दळ असते. असे असले तरी खारघर वाहतूक पोलीस शाखा अद्याप वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या प्रतीक्षेत आहे. सद्य:स्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक खारघर वाहतूक पोलीस चौकीचा गाडा हाकत आहेत.
खारघर वाहतूक नियंत्रण शाखेची स्थापना २०११ मध्ये करण्यात आली आहे. तेव्हापासून आतापर्यंत ५ सहायक पोलीस निरीक्षकांनी येथे काम पाहिले आहे. मात्र अद्याप एकाही वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे या वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आलेली नाही. खारघर वाहतूक शाखेच्या पोलीस ठाण्यात ६ वर्षांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पदभार प्रभारी म्हणून दुसºया अधिकाºयांना देण्यात आला आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नेमणूक करणे गरजेचे असतानाही एका सहायक पोलीस निरीक्षकावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे.
खारघर वाहतूक पोलीस ठाण्यात संपूर्ण सिडकोसह मोठा परिसर आहे. खारघर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ओवे, कोपरा, बेलपाडा, मुर्बी या गावांचा समावेश खारघरमध्ये होतो. खारघर शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक आहे. तर वाहतूक शाखेत १२ ते १५ वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. लोकसंख्या व वाहनांची गर्दी पाहता वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. खारघर वाहतूक पोलीस ठाणे हे परिमंडळ २ मधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले म्हणून ओळखले जात असून, याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नियुक्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Web Title: khaaragharamadhayae-vaahatauuka-paolaisa-nairaikasaka-naahai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.