लाचखोरीला केडीएमसीचे अभय
By Admin | Updated: November 2, 2014 01:16 IST2014-11-02T01:16:42+5:302014-11-02T01:16:42+5:30
लाचखोरीच्या अनेक प्रकरणांमुळे कुविख्यात झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत लाचखोरीला ‘राजाश्रय’ मिळाल्याचे सुनील जोशींच्या पुनरागमनामुळे सिद्ध झाले आहे.

लाचखोरीला केडीएमसीचे अभय
कल्याण : लाचखोरीच्या अनेक प्रकरणांमुळे कुविख्यात झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत लाचखोरीला ‘राजाश्रय’ मिळाल्याचे सुनील जोशींच्या पुनरागमनामुळे सिद्ध झाले आहे. लाचखोर वादग्रस्त अधिकारी सुनील जोशी याला पुन्हा पालिका सेवेत सामावून घेण्याचा निर्णय आयुक्त रामनाथ सोनवणो यांनी घेतला आहे. हा निर्णय वादग्रस्त ठरला असून, आयुक्तांनी नियमावर बोट ठेवून जोशीच्या रूपाने लाचखोरीला ‘अभय’ दिल्याची चर्चा पालिका वतरुळात रंगली आहे.
लाचखोरीच्या मोहापायी गेल्या 18 वर्षात 16 जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत व त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या अधिका:यांनी महापालिकेच्या विकासाऐवजी स्वत:चाच विकास साधण्यात धन्यता मानली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांनी लाचेची वसुली करण्याची प्रवृत्ती काही केल्या कमी झालेली नाही.
अशाच एका प्रकरणात एका ठेकेदाराकडून 5 लाखांची लाच घेणारे कार्यकारी अभियंता तथा सहायक संचालक नगररचनाकार सुनील जोशीला 22 फेब्रुवारी 2क्1क् रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेडय़ा ठोकल्या होत्या. या लाचखोरीच्या प्रकरणात त्याला निलंबित केले होते. लाचलुचपत विभागाच्या चौकशीत जोशीच्या डोंबिवलीतील बंगल्यात 17 लाख 83 हजार रोख रक्कम, 16 लाख 31 हजार रुपये किमतीचे दागिने, 79 हजार 378 रुपये किमतीची चांदी, 7 एलसीडी टीव्ही, 8 वातानुकूलित यंत्रे त्याचबरोबर लाखो रुपयांची विदेशी दारू अशी बेहिशोबी मालमत्ता सापडली होती.
जोर्पयत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोर्पयत जोशीला कामावर घेण्यात येऊ नये असा ठराव महासभेत यापूर्वीच पारित केला आहे. यावर आगामी महासभेत लोकप्रतिनिधी काय निर्णय घेतात? याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
जोशी केवळ नामधारी
वादग्रस्त लाचखोर अधिकारी जोशी याला कायद्याच्या आधारे सेवेत रुजू करून घेतले असले तरी त्याला बिनकामीच ठेवण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता असलेल्या जोशीला पालिकेच्या दक्षता गुण नियंत्रण विभागाचा कार्यभार देण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र सर्वच स्तरातून होणा:या टीकेनंतर प्रशासनाने सावधगिरीचे पाऊल टाकत जोशीला कोणत्याही विभागाची जबाबदारी न देता केवळ नामधारी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.