केडीएमटीच्या बसला भीषण आग

By Admin | Updated: October 4, 2014 02:30 IST2014-10-04T02:30:33+5:302014-10-04T02:30:33+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कल्याण-मलंगगड बसला शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास भीषण आग लागली.

KDMT bus catches fire | केडीएमटीच्या बसला भीषण आग

केडीएमटीच्या बसला भीषण आग

 कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या  परिवहन सेवेच्या कल्याण-मलंगगड बसला शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास भीषण आग लागली. बसमध्ये 13 प्रवासी होत़़े परंतु चालक वीरेंद्र परदेशी आणि वाहक मनोहर मडके यांच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी झाली नाही. आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली असून केवळ सांगाडा उरला आहे.

गेल्या 1क् महिन्यांतील बसला आग लागल्याची ही दुसरी घटना असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कल्याणहून मलंगगड येथे जात असताना अंबरनाथ तालुक्यातील कु शिवली या ठिकाणी ही घटना घडली. रस्त्याच्या चढणीवर बस चढत असताना दर्शनी भागातून अचानक धूर येऊन आग लागली. या वेळी चालक परदेशी यांनी तत्काळ बसचा वेग कमी करून ती रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहक मडके याच्या साथीने आतमधील प्रवाशांना मागील दाराने उतरवून सुरक्षित ठिकाणी नेले. या वेळी अगिAशामक दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. आगीचे प्रमाण वाढताच गाडीतील अग्निशामक यंत्रने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न झाला़ परंतु याचा काही उपयोग झाला नाही़ अखेर या भीषण आगीत संपूर्ण बस खाक झाली. वा:यामुळे
आणि बसची बॉडी फायबरची असल्यामुळे आगीचे प्रमाण वाढल्याची माहिती आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांनी दिली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत टाटा कंपनीच्या 3क् बसेस 2क्1क्-11 मध्ये दाखल झाल्या आहेत़ त्यातली ही बस होती. दोन वर्षापूर्वी दाखल झालेल्या गाडय़ांपैकी आणखी एका बसला आग लागल्याने बसच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
च्विशेष म्हणजे 28 डिसेंबर 2क्13 ला कल्याणमधील बैलबाजार परिसरात बसला आग लागली होती. ती बसदेखील कल्याण-मलंगगडच होती. मलंगगड येथून कल्याणकडे येताना ही घटना घडली होती. यात बसचा दर्शनी भाग जळून खाक झाला होता. त्या वेळी बसमध्ये 41 प्रवासी होते. बसचालक आणि वाहकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तेव्हाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

Web Title: KDMT bus catches fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.