तुर्भे येथे केडीएमसीच्या नगरसेवकाला अटक

By Admin | Updated: July 30, 2015 00:08 IST2015-07-30T00:08:55+5:302015-07-30T00:08:55+5:30

बेकायदा शस्त्र खरेदी प्रकरणी तुर्भे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये केडीएमसीचा विद्यमान नगरसेवक महेंद्र गायकवाड याचाही समावेश आहे. महापालिकेच्या येत्या

KDMC corporator arrested in Turbhe | तुर्भे येथे केडीएमसीच्या नगरसेवकाला अटक

तुर्भे येथे केडीएमसीच्या नगरसेवकाला अटक

नवी मुंबई : बेकायदा शस्त्र खरेदी प्रकरणी तुर्भे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये केडीएमसीचा विद्यमान नगरसेवक महेंद्र गायकवाड याचाही समावेश आहे. महापालिकेच्या येत्या निवडणुकीत विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे पिस्तूल खरेदी केल्याची कबुली त्याने दिली आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवारांकडेही अवैध शस्त्रे असल्याने असुरक्षित वाटत होते. त्यामुळेच पिस्तूल बाळगल्याची कबुली महेंद्र गायकवाड याने दिली. अवैध शस्त्र विक्रीसाठी आलेले तिघे व खरेदीसाठी आलेले दोघे अशा पाच जणांना तुर्भे पोलिसांनी गेल्या आठवड्यात पकडले होते. अर्शद शफी अन्वर अहमद (२४), दानिश समशाद अली (२३) व मोहम्मद अनस जमिल अहमद (२३), सचिन गोस्वामी (३६) व संतोष खोसे अशी त्यांची नावे होती.
तपासादरम्यान कुरकानअली त्यागी (४७) हा पोलिसांच्या हाती लागला. कुरकानअलीनेच कल्याण - डोंबिवलीचे नगरसेवक महेंद्र गायकवाड यालाही शस्त्र विकल्याची माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने गायकवाड याच्यासह सुधीर जाधव या त्याच्या मावस भावाला अटक केली आहे. सुधीर हा सराईत गुन्हेगार आहे.
सचिन गोस्वामीने लोणावळा येथे पब चालवताना अडथळा नको यासाठी पिस्तूल घेतले होते.

Web Title: KDMC corporator arrested in Turbhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.