शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कळंबोलीतील उद्यानांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 03:18 IST

कळंबोली वसाहतीतील उद्यानांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गवत, झुडपे वाढली आहेत. तसेच काही ठिकाणी डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले तर काही उद्यानांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली  - कळंबोली वसाहतीतील उद्यानांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गवत, झुडपे वाढली आहेत. तसेच काही ठिकाणी डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले तर काही उद्यानांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या कारणाने कळंबोलीकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे, तसेच लहान मुलांना खेळता येत नाही.सिडकोने आरक्षित भूखंडावर उद्याने निर्माण केली. त्या त्या सेक्टरचे रहिवाशांना विरंगुळ्याकरिता चांगले ठिकाण मानले जात होते. मात्र या उद्यानाच्या देखभालीकडे सिडकोने लक्षच दिले नाही. त्यामुळे आज येथील अवस्था बिकट आहे. सेक्टर -१0 येथे १६ आणि १७ या दोन भूखंडावर उद्यान आहे. सिडकोने येथे सुरूवातीला सुविधा निर्माण केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने या सुविधा सुस्थितीत राहिल्या नाहीत. भूखंड क्र मांक-१६मध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. तसेच झाडे झुडपांचे प्रमाण जास्त आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने या निरूपयोगी झुडपांची वाढ अधिक होत आहे. त्यामुळे या उद्यानाचा वापर करता येत नाही. सायंकाळच्या वेळी डासांचे प्रमाण तर असतेच तसेच सापांचा वावर वाढला आहे. जॉगिंग ट्रॅकवर हे सरपटणारे प्राणी येत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. भूखंड क्र मांक-१७मधील विजेचे फक्त खांब उभे आहेत, त्यांना दिवेच नाहीत. मध्यभागी हायमास्ट असला तरी त्याचा प्रकाश संपूर्ण उद्यानात पडत नाही. तसेच येथे पाणी साचत असल्याने चिल्ड्रन पार्कमध्ये दलदल झाली आहे. सेक्टर -११मधील उद्यानातही तीच स्थिती आहे. या परिसरातही गवत वाढले आहे. सेक्टर-५ई मधील उद्यानामध्ये दलदल असल्याने तिथे फेरफटका मारताना त्रास होत आहे.पावसाळा असल्याने गवत वाढले आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यानुसार सर्व उद्यानांची पाहणी करण्यात येईल आणि ज्या त्रुटी आहेत त्या काढण्यात येईल. तसेच गवत कटिंगचे काम हाती घेण्यात येईल- गिरीश रघुवंशी,कार्यकारी अभियंता,सिडको, कळंबोली नोडपायाभूत सुविधा देण्याकरिता सिडकोने कायम आखडता हात घेतलेला आहे. त्यामध्ये उद्यानाचा विषय सर्वात अग्रभागी म्हणावा लागेल. आता तर महापालिका झाली असल्याने सिडको प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मनपाकडे बोट दाखवते. मात्र त्यांनी हे गार्डन सुस्थितीत करून दिले पाहिजे.- अशोक मोटे,चिटणीस भाजपा, पनवेल तालुकास्मृती गार्डनला अवकळाफायरबिग्रेडपासून जवळ असलेल्या स्मृती गार्डनला अवकळा आली आहे. पाऊस असल्याने आता या प्रशस्त गार्डनमध्ये चिखलाचे साम्राज्य दिसून येते. एलआयजीमधील पाणी येथे उतरत असल्याने वर्षभर रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होतो. लहान मुलांकरिता खेळणी बसविली असली तरी तिथे आता डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उद्यानाच्या बाहेरील पदपथावर बेकायदेशीर गॅरेज असल्याने तिथे आॅईल टाकले जाते. तिथे अनेकदा लहान मुले घसरून पडतात.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या