कळंबोली सर्कलवरील रस्ते खड्ड्यांत

By Admin | Updated: July 16, 2017 02:47 IST2017-07-16T02:47:24+5:302017-07-16T02:47:24+5:30

वर्दळीचे जंक्शन असलेले कळंबोली सर्कल परिसर खड्ड्यांनी डॅमेज झाल्याने चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतूककोंडी होतेच, तसेच लहान-मोठे अपघातही घडतात.

Kalamboli road crossing roads | कळंबोली सर्कलवरील रस्ते खड्ड्यांत

कळंबोली सर्कलवरील रस्ते खड्ड्यांत

- लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : वर्दळीचे जंक्शन असलेले कळंबोली सर्कल परिसर खड्ड्यांनी डॅमेज झाल्याने चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतूककोंडी होतेच, तसेच लहान-मोठे अपघातही घडतात. याबाबत संबंधित यंत्रणेकडून उपाययोजना होताना दिसत नाही.
कळंबोली सर्कलला पनवेल-सायन, मुंबई-गोवा महामार्ग, जेएनपीटीकडे जाणारा महामार्ग हे जोडले जातात. द्रुतगती महामार्ग येथूनच सुरू होतो. एकंदर जंक्शन असल्याने येथे रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते.
विशेष करून बाजूला लोह-पोलाद मार्केट असल्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहने येतात. जेएनपीटीलाही कळंबोली सर्कलवरूनच जावे लागते. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे सर्कलला मोठमोठे खड्डे पडले आहेत.
पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली वाहतूक शाखेसमोर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्यामध्ये साचत असल्याने वाहनचालकांना काहीच अंदाज येत नाही. त्यामुळे दररोज दुचाकी या खड्ड्यांत आदळतात. नवीन रस्ता करीत असताना पाण्याच्या निचरा करण्याकरिता चांगली उपाययोजना न झाल्याने, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. कळंबोली स्टील मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याची फारशी चांगली स्थिती नाही. मुंब्रा महामार्गावर कळंबोली सर्कललगत खड्डे पडले आहेत.
जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गावर जंक्शनजवळ खड्डे आहेत. या रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. त्यांच्यात समन्वय नसल्याने अशा प्रकारची स्थिती निर्माण होत आहे.
कळंबोली वाहतूक विभागाच्या वतीने खड्ड्यांबाबत संबंधित विभागाला पत्र दिले असल्याचे कळंबोली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी गोरख पाटील यांनी सांगितले.

Web Title: Kalamboli road crossing roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.