भंगार व्यावसायिकाने केली खोटी तक्रार
By Admin | Updated: December 9, 2014 22:33 IST2014-12-09T22:33:56+5:302014-12-09T22:33:56+5:30
वाळीत टाकणो आणि सामाजिक बहिष्काराच्या घटना रायगड जिल्हय़ात वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

भंगार व्यावसायिकाने केली खोटी तक्रार
अलिबाग : वाळीत टाकणो आणि सामाजिक बहिष्काराच्या घटना रायगड जिल्हय़ात वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. असे असतानाच, वाळीत टाकण्याच्या खोटय़ा तक्रारीचे प्रकरण समोर आले आहे. भंगार व्यवसायास अभय मिळविण्यासाठी हुसेन सुब्राती मोमीन याने ही तक्रार केल्याचे उघडकीस आले आहे.
मोमीन गेल्या तीन वर्षापासून पोयनाडमध्ये भंगार व्यवसाय करीत आहे. या व्यवसायाच्या निमित्ताने तो काही कुटुंबांना सातत्याने त्रस देत आहे. मुस्लीम समाजाच्या दफन भूमीच्या कुंपणाच्या बांधकामांस त्यांनी विरोध केल्याचे समाज प्रतिनिधी विश्वस्त मझहर बरमारे व उमर ईस्माई छापेकर व नूर इब्राहिम छापेकर यांनी सांगितले.
मुस्लीम समाज विश्वस्तांना केवळ त्रस देण्याच्या हेतूने, पोयनाडच्या मुस्लीम समाज विश्वस्त व पंचांनी आपल्या कुटुंबास वाळीत टाकल्याची तक्रार 15 जून 2क्13ला त्याने पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार पोयनाड पोलिसांनी मुस्लीम समाज विश्वस्त व पंचांविरुद्ध गुन्हा दाखल करुन प्रकरण न्यायालयात पाठविले. मात्र यावेळी मोमीन यांच्या कुटुंबास वाळीत टाकण्यात आल्याचा कोणताही पुरावा न्यायालयासमोर येवू शकला नाही. (विशेष प्रतिनिधी)
जिल्हा प्रशासनाचे कारवाईचे आदेश
4पोयनाड मुस्लीम समाज विश्वस्त व पंचांचे लेखी निवेदन जिल्हा प्रशासनाला आले आहे. त्या अनुषंगाने कार्यवाहीचे आदेश देण्यात आल्याची माहिती रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली. मोमीनविरुद्ध फौजदारी सुनावणी सुरु असून कार्यवाहीचे आदेश जिल्हाधिका:यांनी दिले आहे.
ग्रामपंचायतीची नोटीस
4ग्रामस्थांना बेकायदा भंगार व्यवसायामुळे त्रस होत असल्याच्या तक्रारी आहेत. ध्वनी व वायू प्रदूषणाचा त्रस होत असल्याने आपण आपला हा भंगार व्यवसाय तत्काळ बंद करावा, अशी नोटीस ग्रामपंचायतीने मोमीन यांना बजावली आहे.