सुगंधी उटणे बनविण्यासाठी ज्येष्ठ सरसावले
By Admin | Updated: October 27, 2015 00:34 IST2015-10-27T00:34:18+5:302015-10-27T00:34:18+5:30
वृद्धापकाळात ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या भेडसावतात. याशिवाय आपला वेळ कसा घालवावा, हा त्यांच्यासमोर यज्ञप्रश्न असतो

सुगंधी उटणे बनविण्यासाठी ज्येष्ठ सरसावले
पनवेल : वृद्धापकाळात ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या भेडसावतात. याशिवाय आपला वेळ कसा घालवावा, हा त्यांच्यासमोर यज्ञप्रश्न असतो. यावर पर्याय शोधत पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक सभागृहात ५० ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन दिवाळीत लागणारे उटणे बनविण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कामाचा मोबदला तर मिळणारच आहे, शिवाय त्यांची चांगली करमणूकही होत आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाचे पनवेलमध्ये ७५० सदस्य आहेत. या वर्षी २५० किलो उटणे तयार करण्याचे ध्येय या ज्येष्ठ नागरिकांनी बाळगले आहे. त्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंतची दिनचर्या ज्येष्ठांनी ठरविली आहे.
प्रत्येक ज्येष्ठ नागरिक १ किलो उटण्याचे पॉकेट तयार करून त्याची विक्र ी आपल्या सोसायटी व आजूबाजूच्या परिसरात करणार आहे. याचा फायदा ज्येष्ठ नागरिक संघाला होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे तयार केलेले हे उटणे आयुर्वेदिक असल्यामुळे उटण्याला मोठी मागणीही आहे. हे काम करताना आमच्यामध्ये तारु ण्य संचारल्याची प्रतिक्रि या उटणे बनविणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी दिली. (प्रतिनिधी)