स्पोर्टस क्लबवरून युतीत जुंपली
By Admin | Updated: September 14, 2015 03:54 IST2015-09-14T03:54:22+5:302015-09-14T03:54:22+5:30
कल्याण स्पोटर््स क्लबचे उद्घाटन मंगळवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. परंतु, तेथील काही कामे अर्धवट असून त्याचे उद्घाटन करण्याचा घाट का घातला आहे

स्पोर्टस क्लबवरून युतीत जुंपली
अनिकेत घमंडी , डोंबिवली
कल्याण स्पोटर््स क्लबचे उद्घाटन मंगळवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. परंतु, तेथील काही कामे अर्धवट असून त्याचे उद्घाटन करण्याचा घाट का घातला आहे, ते करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी गोविंदवाडी बायपासच्या अर्धवट कामाची पूर्तता करायला हवी. मात्र, त्याकडे ते सोयीस्करपणे काणाडोळा करत आहेत. जे काम त्यांच्या खात्यांतर्गत येत आहे, त्याची पूर्तता करण्यावर भर द्या. मात्र, पालकमंत्री केवळ निवडणुकांच्या तोंडावर पक्षश्रेष्ठींसह या ठिकाणच्या नागरिकांची दिशाभूल करत असल्याची बोचरी टीका कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका हवी की नको, यावरून शिवसेना-भाजपात जुंपलेली असताना आता कल्याण स्पोटर््स क्लबमुळेही युतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यासंदर्भात पवार यांनी ‘लोकमत’जवळ पालकमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. जेव्हा, हे प्रोजेक्ट रखडलेले होते, त्या स्पोटर््स क्लबसंदर्भात त्यांच्या महापौरांनी ६० वर्षांचे कंत्राट देण्याचे ठरवले होते. परंतु, त्यात पवार यांनी स्वत: लक्ष घालत तेच कंत्राट २० वर्षांसाठी दिल्याचाही दावा त्यांनी केला. तेव्हा त्यांनी याबाबत लक्ष घातले नाही. केवळ उद्घाटनासाठी पालकमंत्री स्वत: शुक्रवारी त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी गाड्यांच्या ताफयासह तेथे गेले होते. तेथे त्यांनी १५ ला ओपनिंग आहे, तयारी करा, असे सांगितले. मात्र, या सर्व भूमिकेत त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपाला कुठेही विचारातही घेतलेले नसल्याचे ते म्हणाले. पालकमंत्र्यांनी कल्याण-शीळ मार्गावरील रस्त्याची दुरवस्था याकडे का लक्ष दिलेले नाही. हे किती योग्य आहे, जे खाते त्यांच्याकडे आहे, त्याची कामे तरी केली आहेत का? असा सवाल पवार यांनी केला.