शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

'बाळासाहेबांच्या प्रेरणेतूनच मराठी तरुणांसाठी नोकरी मेळावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 16:22 IST

नवी मुंबई येथे सिडको प्रदर्शनी केंद्राच्या भव्य सभागृहात आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुण्यानंतर नवी मुंबईतील हा उद्योग विभागाचा दुसरा मेळावा होता,

ठाणे - युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारा इतका शिस्तबद्ध आणि पारदर्शी मेळावा देशातील कुठल्याही राज्यात होत नसेल असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याविषयी बोलतांना सांगितले. नवी मुंबई येथे सिडको प्रदर्शनी केंद्राच्या भव्य सभागृहात आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुण्यानंतर नवी मुंबईतील हा उद्योग विभागाचा दुसरा मेळावा होता, सुमारे 7 हजार युवक युवतींनी यासाठी नोंदणी केली होती. तसेच 175 कंपन्यांनी यात सहभागी घेतला असून सीआयआयने या मेळाव्यासाठी सहकार्य केले होते. या उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.

सुभाष देसाई बोलतांना म्हणाले की, या मेळाव्यास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यामागे उद्देश हाच आहे की, बाळासाहेबांच्या प्रेरणेतूनच मराठी तरुणांना नोकऱ्या देणारी चळवळ सुरू झाली. एअर इंडिया, रेल्वे, मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या अशा ठिकाणी नोकऱ्या मिळणे सुरू झाले. यापुढील काळात असे मेळावे घेण्यात येणार असून प्रत्येक मेळावा चोख आणि पारदर्शी व्हावा असे नियोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी युवकांना जागीच संबंधित कंपन्यांतर्फे मुलाखती घेऊन ऑफर लेटर्स देण्यात येत असून ज्यांची निवड होणार नाही, त्यांना पुढील काही दिवसांत उद्योग विभागाच्या कार्यालयांत मुलाखती घेऊन त्यांनाही योग्य त्या कंपन्यांत नोकरी मिळेल यासाठी मार्गदर्शन केले जाईल, असे देसाई यांनी म्हटले. राज्यात गुंतवणूक वाढत असून नोकरीच्या संधीही वाढणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. 

* ठाणे आणि कल्याणमध्ये मेळावे घ्यावेतपालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एकीकडे देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असली असे सांगितले जाते मात्र दुसरीकडे नोकऱ्या कमी होत आहेत. 30 लाखाहून अधिक पदवीधर दरवर्षी नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडतात. स्थानीय लोकाधिकार समितीने भूमिपुत्रांना नोकरी देण्याची चळवळ सुरू केली आणि आज या मेळाव्याच्या निमित्ताने नामांकित कंपन्या आणि उमेदवार हे समोरासमोर एका छताखाली येऊन हे मेळावे यशस्वी करीत आहेत हे मोठे यश आहे त्याबद्धल उद्योगमंत्री देसाई यांचे मी अभिनंदन करतो. ठाणे आणि कल्याणमध्येही असे रोजगार मेळावे भरवावे अशी सूचनाही त्यांनी केली. या कार्यक्रमास खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, झोपडपट्टी पुनर्वसनचे विजय नाहटा आदींची उपस्थिती होती. 

 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईNavi Mumbaiनवी मुंबईBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेjobनोकरी