जेएनपीटीचे ४०४ कोटी थकीत
By Admin | Updated: August 21, 2015 00:00 IST2015-08-21T00:00:04+5:302015-08-21T00:00:04+5:30
नामांकित तेल, रासायनिक कंपन्या, सीएफएस, शिपिंग कंपन्या, एजंट यांनी पाणी, वीज आणि भुईभाडे यापोटी जेएनपीटीची ४०४ कोटींची रक्कम थकविली आहे.

जेएनपीटीचे ४०४ कोटी थकीत
उरण : नामांकित तेल, रासायनिक कंपन्या, सीएफएस, शिपिंग कंपन्या, एजंट यांनी पाणी, वीज आणि भुईभाडे यापोटी जेएनपीटीची ४०४ कोटींची रक्कम थकविली आहे. सातत्याने नोटीसा पाठवूनही कंपन्या बिले भरण्यात टाळाटाळ करत आहेत, अशी माहिती जेएनपीटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
जेएनपीटीने आपल्या मालकीच्या अनेक जमीनी तेल, रासायनिक, शिपिंग कंपन्या आणि एजंट, सीएफएस यांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. तेल आणि रासायनिक कंपन्यांनी तर जेएनपीटी परिसरात मोठ टँकफार्म उभारले आहेत. जेएनपीटी पाणी, वीज आणि देखभालीचाही खर्च करते. मात्र भाडेकरु कंपन्या मात्र जेएनपीटीला भाडे देण्यात टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे परिसरातील १२ तेल व रासायनिक कंपन्यांनीच १९ आॅगस्ट २०१५ अखेर जेएनपीटीची ३४३ कोटींची रक्कम थकवली आहे.
यापैकी थकबाकीदार कंपन्यांचा भाडेपट्टीचा करार मागील साडेचार वर्षांपूर्वीच संपुष्टात आला आहे. तरीही थकबाकीदार कंपन्या भाड्याने दिलेल्या जमीनीच्या क्षेत्रापेक्षा अधिक पटीने जमीनीचा वापर करून कोट्यवधींचा नफा कमावित आहेत, मात्र थकीत रकमेचा भरणा करण्यास तयार नाहीत.